Posts

Showing posts from September, 2017

संतोषता

* संतोषता * --------------:-D अनेकदा असे दिसते की सर्वसाधारण मनुष्य आपल्या आयुष्यात नेहमी असमाधानी असतो. जे आहे त्यात समाधान न मानता अजून अपेक्षा करत बसतो. अशाने एक प्रकारची वखवख त्याच्या अंगात भिनते. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की मग दुसर्‍याच्या उत्कर्ष पाहून त्याचा जळफळाट होतो. दिवसरात्र अतृप्त इच्छांचे विचार आणि त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा यातच त्याच्या आयुष्यातील बराच काळ निघून जातो. प्रत्येक व्यक्तीने संतोष अंगी बाणवला पाहीजे. हा फार महत्वाचा गुण आहे.संतोषता म्हणजे आहे त्यात समाधान मानणे.आहे त्या परिस्थित संतुष्ट राहणे.जेवढे आपल्या हातात आहे. तेवढ्यात संतुष्ट राहणे..एक व्यक्ती दररोज दोनशे रूपये कमावतो.त्या दोनशे रूपयात प्रपंच,उदरनिर्वाह,सर्वसोयीयुक्त भागत असे.समाधानी परिवार ,सुखी परिवार या उक्तीप्रमाणे त्यांचा लौकिक असायचा .पण हळुहळु कर्त्याला त्यातही असंतोष जाणवे .अधिक मिळण्याच्या अट्टाहासापायी तो कधी वाईटमार्गाने गेला त्यालात कळले नाही. मग काय ..वाईट सवयींचा परिणाम घरातही होऊ लागला.कालपर्यत दोनशे रूपये कमावणारा आज अचानक हजार रूपये कमावता झाला तेपण वाईट मार्गाने...