संतोषता

*संतोषता*
--------------:-D

अनेकदा असे दिसते की सर्वसाधारण मनुष्य आपल्या आयुष्यात नेहमी असमाधानी असतो. जे आहे त्यात समाधान न मानता अजून अपेक्षा करत बसतो. अशाने एक प्रकारची वखवख त्याच्या अंगात भिनते. आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की मग दुसर्‍याच्या उत्कर्ष पाहून त्याचा जळफळाट होतो. दिवसरात्र अतृप्त इच्छांचे विचार आणि त्या पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा यातच त्याच्या आयुष्यातील बराच काळ निघून जातो. प्रत्येक व्यक्तीने संतोष अंगी बाणवला पाहीजे. हा फार महत्वाचा गुण आहे.संतोषता म्हणजे आहे त्यात समाधान मानणे.आहे त्या परिस्थित संतुष्ट राहणे.जेवढे आपल्या हातात आहे. तेवढ्यात संतुष्ट राहणे..एक व्यक्ती दररोज दोनशे रूपये कमावतो.त्या दोनशे रूपयात प्रपंच,उदरनिर्वाह,सर्वसोयीयुक्त भागत असे.समाधानी परिवार ,सुखी परिवार या उक्तीप्रमाणे त्यांचा लौकिक असायचा .पण हळुहळु कर्त्याला त्यातही असंतोष जाणवे .अधिक मिळण्याच्या अट्टाहासापायी तो कधी वाईटमार्गाने गेला त्यालात कळले नाही. मग काय ..वाईट सवयींचा परिणाम घरातही होऊ लागला.कालपर्यत दोनशे रूपये कमावणारा आज अचानक हजार रूपये कमावता झाला तेपण वाईट मार्गाने मग काय ..दररोज कलह ,वाद,घरात सर्वत्र असंतोष परसला.इतरांकडे आहे या अट्टाहासाने सर्व विनाश होऊन बसला .हसणारे घराला अश्रुचे धारे सुटले.जेवढे आहे त्यात समाधान मानने.जे आहे त्यात संतुष्ट राहणे .हेच सुखी जीवनाची गुरूकिल्ली आहे.जेव्हा वेळ येते तेव्हा सर्व आयुष्यात मिळते .आपण फक्त आपले धैर्य,कष्ट,चिकाटीपणा सोडायचा नाही. संतोष झाला म्हणजे काय झाला जेव्हा घरात बसुन आनंद खेळताना दिसतो,प्रगती चालताना दिसते,यश उभा असलेला दिसतो, शांती पसरलेली दिसती.मुलांच्या चेहऱ्यावर सुख दिसते,बायकोच्या चेहऱ्यावर समाधान हसते,आईवडीलांच्या मुखावर संतुष्टता येते तेव्हा आपल्या अंगात हा संतोष खेळत असतो.जोपर्यत हा अंगी असतो तोपर्यत सुखशांती,आनंद हे सर्व बरोबर असतात.हा गेला की हळुहळु सर्व निघुन जाते.गडगंड संपत्ती असुनही जर संतोष नसेल तर त्या संपत्तीला काय करायचं.दोन भाकरी संतोषची खाण्यात जेवढे सुख आहे.तेवढे हाॅटेलात  हजारो रूपये बिल देऊन असंतोषता होऊन खाण्यात नाही.

*जीवनात संतोष असणे हे सुखाचे लक्षण आहे.*
=====================💢
*अधिकृत लेखन: श्रीधर कुलकर्णी*
स्वलिखित... कृपया कलिच्या नोकराप्रमाणे नाव खोडण्यात येऊ नये.
२५;०९;२०१७..६:००..

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट