Posts

Showing posts from August, 2018

शुभ मैत्री दिवस

*शुभ मैत्री दिवस* ------------------------- ऑगस्टच्या पहिल्याच रविवारी जागतिक मैत्री दिवस साजरा केला जातो. काही जणांसाठी तर हा पूर्ण आठवडाच मैत्रीपूर्ण असा आहे. ग्रुपसोबत गंमतीजमती करण्यासाठी राखून ठेवलेला वेळ फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने उपयोगी येतो. आपल्या आवडत्या मित्रांना, वेळोवेळी मदत केलेल्या लोकांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हातावर मैत्रीची खूण असावी म्हणून फ्रेंडशिप बँड बांधले जातात. काही मित्रांना एकावेळेस एवढे बँड आणणे शक्य नसल्याने हातावर पेनाने वा मार्करने आपलं नाव दोस्ताच्या हातावर लिहितात. हा मैत्री दिन साजरा करण्यासाठी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तरुणाईची जोरदार खरेदी सुरू होते. फिरायला जायचे प्लान रचले जातात, पार्टीची आखणी केली जाते. काही ग्रुप्स सुट्टी टाकून दुरवर फिरायला जातात. हाच एक दिवस असतो, आपल्या मित्रांचा आदर करण्याचा, त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा. संपूर्ण वर्षभरात केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचा. कळत नकळत झालेली मैत्री बहरते कधी हे समजतच नाही. मग त्यातून निर्माण होतं ते जिव्हाळ्याचं नातं. मैत्री म्हणजे मजामस्ती, हसणे, खिदळणे आ...