शुभ मैत्री दिवस
*शुभ मैत्री दिवस*
-------------------------
ऑगस्टच्या पहिल्याच रविवारी जागतिक मैत्री दिवस साजरा केला जातो. काही जणांसाठी तर हा पूर्ण आठवडाच मैत्रीपूर्ण असा आहे. ग्रुपसोबत गंमतीजमती करण्यासाठी राखून ठेवलेला वेळ फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने उपयोगी येतो.
आपल्या आवडत्या मित्रांना, वेळोवेळी मदत केलेल्या लोकांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या हातावर मैत्रीची खूण असावी म्हणून फ्रेंडशिप बँड बांधले जातात. काही मित्रांना एकावेळेस एवढे बँड आणणे शक्य नसल्याने हातावर पेनाने वा मार्करने आपलं नाव दोस्ताच्या हातावर लिहितात. हा मैत्री दिन साजरा करण्यासाठी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तरुणाईची जोरदार खरेदी सुरू होते.
फिरायला जायचे प्लान रचले जातात, पार्टीची आखणी केली जाते. काही ग्रुप्स सुट्टी टाकून दुरवर फिरायला जातात. हाच एक दिवस असतो, आपल्या मित्रांचा आदर करण्याचा, त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्याचा. संपूर्ण वर्षभरात केलेल्या उपकारांची परतफेड करण्याचा. कळत नकळत झालेली मैत्री बहरते कधी हे समजतच नाही. मग त्यातून निर्माण होतं ते जिव्हाळ्याचं नातं.
मैत्री म्हणजे मजामस्ती, हसणे, खिदळणे आणि शेवटपर्यंत साथ देणे. अडचणीच्या वेळी कोणी आले नाही तरी मित्रमैत्रिणी नक्की धाऊन येतात. आपल्या आयुष्यात अनेक नाती असतात पण दीर्घकाळ टिकणारं, कधीही न तुटणारं असं नातं म्हणजे मैत्रीचं. जे विश्वास आणि मदतीच्या आधारावर टिकलेलं आहे. मैत्रीत ना वर्णभेद असतो ना लिंगभेद. मैत्री ही लहानांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत कोणाशीही असू शकते.
आजकाल फ्रेंडशिप डे सोशल मीडियावरही साजरा केला जातो. आपल्या सगळ्या मित्रांचे फोटो एकत्र करून त्याचा कोलाज तयार करून तो सोशल मीडियावर टाकून छानसं कृतज्ञतापूर्ण स्टेटस ठेऊन त्या मित्राला ती पोस्ट टॅग करून त्याच्याबद्दलची आपुलकी दाखवली जाते. काहींच्या मते मैत्री ही दाखविण्याचं नातं नसून सिद्ध करण्याचं नातं आहे. मैत्रीसाठी कोणतेही बंधन आवश्यक नसतं. वयोमर्यादा नसते.
आपल्याला हवं ते करण्याची मुभा या नात्यात असते. म्हणूनच मित्रमैत्रिणींपासून दूर गेल्यावर काहींच्या डोळ्यांत आपसुकच पाणी येतं. आपण मागे कधीतरी रडलेले दिवस आठवले की आता हसायला येतं, आणि पूर्वी कधी मित्रांसोबत मनसोक्त हसलेले दिवस आता आठवलं की आता रडायला येतं. मैत्रीत रुसवेफुगवे असतात, कधी अबोला असतो तरी पण एकमेकांविषयी तेवढीच काळजी पण असते.
आयुष्याच्या पूवार्धात कधी डोकावून बघितलं एक नक्की जाणवेल की परीक्षांमधून मिळालेल्या गुणांमुळे आपल्याला कायमचं सुख मिळतं असं नाही पण लेक्चर बंक करून मित्रांसोबत केलेल्या मस्तीची आठवण आली की नेहमीच आपसूकच डोळ्यांतून आठवणीचे अश्रू ओघळतील. त्यामुळे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आपल्याच काही मित्रमैत्रिणींनी त्यांच्या आठवणी, त्यांचे काही किस्से सांगितले आहेत..व जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो.
=======================
*श्रीधर कुलकर्णी*
*ज्ञानामृत मंच समुह*

Comments
Post a Comment