*माझी शाळा*
*माझी शाळा* -------------------- सर्वप्रथम माननीय अॅडमीनचे आभार प्रकट करतो ..ज्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा समुह काढला...त्यायोगे बालपणीचे ते दिवस आठवुन पुन्हा त्याचे समोर राहु लागले....आजही ती शाळा आठवली की उगीच मोठे झालो असे वाटते.त्या शाळेनिमित्त काहीसे निवडक दोन शब्द सांगायचा माझा प्रयत्न ...खरतर काय लिहावे..शब्दही कमी पडतील अशी माझी शाळा होती.. शाळा म्हटलं की, सगळ्या जुन्या आठवणींना एकदम उजाळा येतो व त्या एका चित्राप्रमाणे डोळ्यांसमोर उभ्या राहतात. आज शालेय शिक्षण पूर्ण होऊन जवळ जवळ बरेच वर्षाचा कालावधी उलटून गेला. तरी आठवणी मात्र अगदी ताज्या वाटतात. आजही माझी शाळा म्हणजे जशी सोडली तशीच आहे एक विस्तीर्ण, मोठे प्रशस्त मैदान.. आता जरी बदल झाला असली तरी मी शाळेत असताना ती बैठीच, अगदी घराप्रमाणे होती. चारी बाजूंनी वर्ग होते व त्याला लागुन त्या प्रशस्त मैदानात जेव्हा खेळाचे सामने व्हायचे तेव्हा दोन कब्बडीचे, दोन लंगडीचे, एक खो-खोचा सामना, उंच उडी, गोळा फेक असे सामने व्हायचे. त्यात त्या मैदानाच्या चारी बाजूंना वर्ग व मोठी झाडे आहेत. त्यामुळे आम्हाला रो...