एक .. वेळ
एक_वेळ .. --------------------- एक वेळ अशी होती की ती वेळच आपली नव्हती , माणसे ,नाती,सर्व परकी होता. उणिवा काढण्यातच त्यांची महती होती.असुन परकं करून टाकणारी भावकी होती.चुक समजुन सांगण्यात त्यांची इच्छा नव्हती. इच्छाच काय तर मायाच नव्हती.फक्त नावं ठेवण्याची मात्र त्यांच्यात गुणवत्ता होती.आपण त्यांच्या पात्रतेत नाही म्हणुन सारखे त्यांना वाटत असते.गेलोच कधीतरी तर नाके मुरडायची भारी हौस असते.एक वेळ अशी होती की, त्यांच्या सुशिक्षित पुढे आपला अडाणीपणा शोभत नव्हता.त्यांच्या टापटीप पुढे आपला गावरानपणा जमत नव्हता.काय तर काय कधी आपलीच बोलीभाषा पटत नव्हती. *"काय वाटे कुणास ठाऊक , काटा रूते कुठे देवास ठाऊक"*होते तर सारे तरी नसल्यासारखे वाटे कुणी हक्काने कान पकडावे असे असुन नसल्यासारखे होते.एक वेळच अशी असती की आपले परके होतात व परके आपलेच असतात. आता वेळ अशी की त्यांना कुठे रूतले कुणास ठाऊक विचारणा माझी होऊ लागते... खराब म्हणता म्हणता कधी त्यांच्या पात्रतेत बसायला लागतो तेच कळत नाही. किमया कसली कळतच नाही. आणि हे घडले कसे ते ही समजत नाही.सुशिक्षितपणा पुढे आम्ही अडाणी ...