एक .. वेळ

      एक_वेळ..
---------------------

एक वेळ अशी होती की ती वेळच आपली नव्हती , माणसे ,नाती,सर्व परकी होता. उणिवा काढण्यातच त्यांची महती होती.असुन परकं करून टाकणारी भावकी होती.चुक समजुन सांगण्यात त्यांची इच्छा नव्हती. इच्छाच काय तर मायाच नव्हती.फक्त नावं ठेवण्याची मात्र त्यांच्यात गुणवत्ता होती.आपण त्यांच्या पात्रतेत नाही म्हणुन सारखे त्यांना वाटत असते.गेलोच कधीतरी तर नाके मुरडायची भारी हौस असते.एक वेळ अशी होती की, त्यांच्या सुशिक्षित पुढे आपला अडाणीपणा शोभत नव्हता.त्यांच्या टापटीप पुढे आपला गावरानपणा जमत नव्हता.काय तर काय कधी आपलीच बोलीभाषा पटत नव्हती. *"काय वाटे कुणास ठाऊक , काटा रूते कुठे देवास ठाऊक"*होते तर सारे तरी नसल्यासारखे वाटे कुणी हक्काने कान पकडावे असे असुन नसल्यासारखे होते.एक वेळच अशी असती की आपले परके होतात व परके आपलेच असतात.

आता वेळ अशी की त्यांना कुठे रूतले कुणास ठाऊक विचारणा माझी होऊ लागते... खराब म्हणता म्हणता कधी त्यांच्या पात्रतेत बसायला लागतो तेच कळत नाही. किमया कसली कळतच नाही. आणि हे घडले कसे ते ही समजत नाही.सुशिक्षितपणा पुढे आम्ही अडाणी कसे सुशिक्षित झालो ह्या प्रश्नाचे उत्तर कधी अजुन मिळाले नाही.ज्या वाटेवर कधी येयचे नव्हते ते वाकडी वाट करून तसे येऊ लागले तेच उमजले.नाही. किमया कशी घडाली कळालीच नाही. जे घडले कसे घडले ते कळलेच नाही.पण एवढे कळले की, माणसांची पात्रता असेल तरच विचारणा होते कारण माणसापेक्षा पैसा , कपडे चांगले , काहीतरी पत असेल तरच सारे माश्यावाणी येतात. आणि जेव्हा काही नसते तेव्हा त्यांची नजर ही येत नाही.ही वेळच अशी असती की , केव्हा कधी बदलेल सांगता येत नाही. ही वेळच असते जी आपल्याला कुठे नेऊन ठेवेल सांगता येत नाही.वेळेची किमया खुप वेगळी आहे.जी ती प्रत्येकाला येतेच.म्हणुन कुणीही कधीही मिळुन मिसळुन राहावे.नात्यामध्ये पत,पैसा,प्रतिष्ठा मध्ये आली की नाते एक डिल वाटु लागते.म्हणुन प्रत्येक वेळेस नाते, माया , ममता ,ओढ अशीच ठेवावी.काही चुकल्यास हक्काने कान पकडावे ना की त्यांच्याच चुकाचे उणिवा काढत बसावे..

एक वेळ तशी होती .. एक वेळ आता अशी आहे.ही वेळच आहे जी माझी आहे बाकी सारे काटे आहेत जे सारखे बदलत राहते.मी असा आहे . तुम्ही कसे आहात
?
=====================🙏🏻
✍🏻 स्वयंलिखित..
अधिकृत लेखन : श्रीधर कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट