असा हा एकांत

  असा_हा_एकांत
----------------------
 ज्याला हवाय त्याला न मिळणारा,
आणि ज्याला नकोय त्याची साथ कधीही न सोडणारा
नदीकिनारी, थंडगार निसर्गात हवा हवासा वाटणारा , रात्रीच्या वेळी कुत्र्याच्या रडण्याप्रमाणे काळजात घर करणारा असा हा एकांत
 मनाला वाऱ्याच्या हिंदोळ्यावर अलगत डोलावणारा , खवळलेल्या समुद्रात हेलकावे घ्यायला लावणारा असा हा एकांत..
 आपणहून सुखाच्या गर्तेत गुंग होऊ पाहणारा , त्याच चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा पक्ष्यांचा चिवचिवाट मधुर गाण्यासारखा भासणारा , तोच चिवचिवाट, जीवन किती बेसूर आहे याची जाणीव करून देणारा असा हा एकांत ..
येणाऱ्या आयुष्याकडे आशेने पाहायला शिकवणारा , आयुष्यभर होऊन गेलेल्या चुकांचा शोक करत बसणारा  एकांत चेहऱ्यावर हास्याची रेघ ओढणारा , तीच रेघ हळूच अश्रूंनी मिटवणारा असा हा एकांत..
निर्जीव जीवाला जगणं शिकवणारा , जगणाऱ्याला आतल्या आत मारणारा , मरत असताना ही त्या वेळेत येऊन बसणारा असा हा एकांत..
असा कसा हा एकांत.. प्रत्येकाच्या जीवनात येऊन तडफडतो..स्वताला सुखी राहता येत नाही म्हणुन आपल्यालाही वेदना देतो.. असा कसा हा एकांत ..
======================
ले. :- श्रीधर_कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट