सहवास
*💢 सहवास 💢* ------------------------------- एखाद्या चा सहवास खुप मोलाची गोष्ट आहे. आपल्याला कुणासोबत सहवासाची अपेक्षा आहे..हे पहिले निश्चित करावे. कारण सहवास हा संक्रमण असतो..तो जर चांगला असेल तर खुप काही शिकवतो पण जर वाईट असेल तर खुप काही बिघडवतो.सहवास कसा करावा..कुणाशी करावा..तो विश्वासपात्र आहे ना कि तात्पुरता तो चांगले पणाचे नाटक करत आहे..हे समजुन घेयला हवं...सहवासाचा परिणाम जेवढा हितकारी आहे तेवढास विध्वंसकारी.मित्र असावे चांगले नको ते व्यसनी यासाठीच म्हणले जाते.संताचा सहवास करतो जीवन हे सार्थक असेही म्हणतात. कारण सहवास हा खुप गरजेचा आहे... मित्रमंडळी,नातेवाईक ,परिवार यांचा सहवासातच माणसाचे जीवन कटिबध्द असते...तो ज्या सहवासात वावरतो तो तसा होऊन जातो.सत्संग करा जीवनाचा उध्दार करा यासाठीच म्हणले जाते. सहवासात खुप शक्ती असते.चांगला सहवासाने जीवन मार्गी लागते.आजारी माणसाला ही प्रेमाचा सहवास त्याचे आजार बरे करण्यात मदत करत असतो.जर एखादी व्यक्ती खराब असेल .जर त्याला आपण आपल्या चांगल्या सहवासाचे ओषध दिले तर त्याचे मन परिवर्तन ही होऊ शकते.एका मंदिरात रात्री किर...