आपले मन

   🔅 आपलं मन 🔅

-----------SK-----------

*जेव्हा जपता हे मन तेव्हा होते ते अधीर ..सैरवैर धावण्यासाठी असतो त्यात उगाच हट्ट..नको वाटे त्याला कशाचे बंध...फक्त फिरावे मुक्त मनसोक्त ...*

हे आपले मन जसे घडवेल तसे आपण घडतो ..तो जसा म्हणेल तसे आपण पळतो..आपण मनाच्या अधीन का मन आपल्या अधीन काहीच कळत नाही . फक्त चालत राहतो..तो जसा म्हणेल तसे करत राहतो.हे मन ना खुप चंचल असतं बरं का..त्याला जर मोकळं सोडलं तर तो सुटलेल्या बैलासारखं असतो .केव्हा शेत खराब करेल सांगता येत नाही ..तसे मन केव्हा आपले डोके खराब करील सांगता येत नाही. आपण मनाच्या नाही तर मन आपल्या ताब्यात पाहिजे.आपण जे म्हणेल तसेच त्याने वागले पाहीजे. उगीत त्याची दादागिरी सहन करायची नाही..आपले मन जेव्हा आपल्या अधीन होतं ना तेव्हा ह्या विश्वात असे काही नाही की तुम्ही ते करू शकत नाही. ज्याने मनावर ताबा मिळवला तो एकाग्रता मध्ये उच्चस्तरीय होऊन जातो..आणि एकाग्रता जर सिध्द झाली की,आपण सर्व काही संयमपणाने करू शकतो.आपल्या आध्यात्मिक वृत्तीतही मनाला फार मोठे स्थान आहे .कारण मन एकचित्त झाल्याखेरिज साधनेत एकाग्रता येत नाही.त्यामुळे मनाला स्थिर करणे हे गरजेचे असते.मन हे चंचल  असते. मन आवरणे हे परमार्थात महत्त्वाचे आहे. मन दृश्यामागे धावते, आपण मनामागे धावतो. जेव्हा मनाचे खरेखुरे ज्ञान होते, मनाचे संकल्पविकल्पात्मक स्वरूप समजते, तेव्हा परमार्थाच्या वाटचालीला सुरवात होते. मनाला चैतन्याचे आकर्षण यावयास हवे. एकदा का मनाला चैतन्याचे आकर्षण निर्माण झाले की मनाचे मनत्व उरत नाही. जडाचे गुणधर्म बाजूला झाल्याशिवाय मनाला चैतन्याचे आकर्षण होता होत नाही. मनाचे परिवर्तन होणे हे परमार्थात आवश्यक आहे. पण ते कठिण आहे. त्यासाठी प्रयत्‍न करणे  आवश्यक आहे.

मनाला तुम्ही जसे आकार देताल तसे ते घडते.अगदी जसे कुंभार मडके घडवितो तसे आपण आपल्या मनाला घडवता आले पाहिजे तरच आपली आत्मोन्नती होते.मन हे पाण्यासारखे असते .तुम्ही जिथे टाकाल तिथले त्याचे स्वरूप त्यात ढवळते.व ते तसेच होऊन जाते.म्हणुन आपले मन कुठे गुंतवायचे ते समजले पाहिजे.मन हे आकाश असते त्यात संपुर्ण विश्व मावते पण आपल्याला कोणत्या विश्वात रमायचे आहे .त्यानुसार मनाला तसे निर्माण करायचे मग बघा आपण व आपले मन हे किती स दृढ होते.आपण जसे विचार करू तसे मन आपल्या विचारात न्हाऊन निघत असते.विचार करताना मनाच्या गतीला विशिष्ट वळण द्यावयाचे असते. काही नियम ध्यानांत घेऊन मनाच्या प्रवाहाला विशिष्ट पात्रांतून नेणे म्हणजे विचार करणे. नियम आणि मनाची स्वाभाविक गती, यांच्यामध्ये अर्थातच संघर्ष व विरोध, प्रतिक्रिया व प्रतिकार निर्माण होत असतात.
 या संदर्भात प्रकृती, विकृती आणि संस्कृती हे तीन भाव लक्षात घेणे आवश्यक आहे. मनाची प्रकृती गतिरूप आहे. या गतीची स्वैरता ही विकृती आहे व तालबद्धता ही संस्कृती आहे. ताल म्हणजे नियम. ताल किंवा नियम खरोखर गतीची अर्थवत्ता व संपन्नता वाढवितात.मनाला एका चांगल्या विषयात गुंतवले तर तो विषय अधिकच दृढ होते व त्याचे महत्व अधिकच वाढते.मनाला कधी एकटे सोडु नका..त्याला चांगल्या विषयात गुंतवा तरच तो नीट राहातो ,नाहीतर तो भरकटला तर संपुर्ण जीवनत अस्त्याव्यस्त होऊन जातं.

समर्थ रामदासस्वामी मनाला चांगलच दटावतात ते म्हणातात..
*नको रे मना क्रोध हा खेदकारी।*
*नको रे मना काम नाना विकारी॥*
*नको रे मना सर्वदा अंगिकारू।*
*नको रे मना मत्सरु दंभ भारु*

अरे मना नको क्रोध करू पुन्हा पश्चात्ताप करायची वेळ येईल,या कामाच्या योगाने, रुपहानी शक्तिहानी ,द्रव्यहानी कुळहानी या सर्व हानीच होत असते म्हणुन तु या विषयविकारात फसु नको.
भारी, मोठा, षड्रिपूंत दंभ हा मोठा शत्रु आहे. श्रीसमर्थांनी वर्णिलेल्या षड्रिपूंपैकी काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ या पाचांचाच उल्लेख या श्लोकात आहे. श्रीसमर्थांचे “षड्रिपू” हे  प्रकरण अगदी यावर संक्षिप्तपणे मांडले आहे..
असे हे मन ज्याला ताब्यात घेतलं की तो मनाचा राजा...यावर दोन ओळी वाचनात आलेल्या सुचतात मला..
ज्वालामुखीसारखा तळमळणारा,
तर क्षणात मोहाच्या क्षणाला भुलणारा,
 कित्येकदा चुकणारा,तरी स्वतःच स्वतःला 
सावरणार असं वेडंवाकडं हे आपलच मन.
*मन म्हणजे जीवनाचे रहस्यं,*
*कितीही उलगडा झाला, तरी आयुष्याचा कोडं न सुटणार.*
*असं हे मन, असं हे आपलच मन.*
========================®
स्वलिखित... नाव खोडु नका..
*लेखन : श्रीधर कुलकर्णी*
© १२.०८.२०१७

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट