मैत्री

{   °   मैत्री    °   }
 °°°°°°°°°°°°°°°°

मित्र म्हणजे काय तर मित्र म्हणजे आपल्या जीवनातले एक अंगच असतात. मित्राशिवाय राहणे म्हणजे सुंदर अश्या बागेत बसल्यावर एकही फुल न दिसणे.सगळीकडे भकास व उदासीनता वाटणे.मनुष्यजन्म घेऊन जर मित्रनाते जर नाही मिळवता आले तर जन्म व्यर्थच म्हणावा लागेल..साक्षात कृष्णालाही मित्राची महती माहीत होती.म्हणुन सुदामा सारखा मित्र आल्यावर साक्षात ईश्वरपण आपले आसन सोडुन त्याला भेटायला गेले.

मित्र म्हणजे मित्रच असतो  त्यात गरीब ,श्रीमंत ,अपंग,काळागोरा ..असे काही नसते..जो यात भेदभाव करतो.तो या मित्रत्वाच्या नात्याला कलंक असतो.

*लहानपणापासुन काॅलेजपर्यत व काॅलेजपासुन मरणापर्यत जो या मैत्री नात्याला पाळतो तोच सर्वात श्रीमंत असतो.*आयुष्याच्यावाटेवर बरेच मित्र येतात व काही मित्र अर्ध्यारस्त्यात सोडुन देतात ..पण जो मित्र आयुष्याच्या रस्त्यावर शेवटपर्यंत चालतो तोच खरा मित्र मानला जातो.मैत्रीला काय लागतं.. एक विश्वास जो अखंडपणे दिवासमान सदैव तेवत राहावा. कोणत्याही वाऱ्याने डळमळीत न जाता अखंडपणे उजागर राहावा.

मैत्री कशी असावी ..आरश्यासारखी पारदर्शी,नितळ पाण्यासारखी,विश्वास ,आपलेपणा जपणारी,कोणत्याही संकटात धावुन येणारी व आपण जर वाईट मार्गाला लागलो तर कान धरून वटणीवर आणणारी,आपल्या स्वप्नात आपल्या बरोबर चालणारी,ताटातली अर्धी भाकर देऊन आपल्याला सांभाळणारी,आपण अडचणीत असता आपल्याला सांभाळणारी,आपल्यासाठी सर्व बंधने सोडुन देणारी ,एकमेंकाच्या सुखदुखात सदैव तत्पर असणारी ..मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं, चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एकमेकांचा आधार बनणं.  ..मैत्री चे व्याख्या भरपुर आहेत सांगेल तेवढे कमीच ..मैत्रीचे महती जेवढे वर्णावी तेवढी कमीच..मैत्री हे परमनातं असतं जे कुठल्याही मानपान,हेवाजोखा पासुन अलिप्त असते.श्री.. कु.

मैत्रीला काही वय ,शिक्षण नसते..ती कुणी बरोबरही केव्हाही होऊ शकते.मैत्रीही पुरूषांचीपण होऊ शकते वा स्त्रियांशीही त्याला काही बंधन नाही .पण हल्ली या मैत्री नात्याला समाज फार दुषित दृष्टीने बघत असतो ..हे पाहुन खुप वाईट वाटतं ..का एका स्त्रीला पुरूषांशी वा एका पुरूषाला स्त्रीशी मैत्री करण्याचा अधिकार नसतो का ? खरे सांगायचे तर मैत्री ला कोणतेही बंधने नसते.मैत्री ही मैत्री च असते जे परमनातं असते..असे नाते जे स्वयं ईश्वरालाही कच्चे पोहे खायला लावते.श्री.. कु..

मैत्री टिकवावी व ती टिकवुन ठेवण्यात आपण सदैव समर्पित राहिले पाहिजे तरच मैत्री या खऱ्या अर्थाने जागृत राहाते.
एक व्याख्या आहे की,
चांगले मैत्र मिळणे कठिण, मिळाले तर गमावणे कठीण़, विसरणे तर त्यापेक्षाही कठीण..
म्हणुन मैत्री व मित्राचा कधीही विश्वासघात करता कामा नये.माझ्या मतें तर एकदा मैत्री केली तर ती शेवटपर्यत निभवावी नाहीतर मैत्रीच करू नये...

*मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात*
*नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.....*
=======================®
© स्वयंलिखित ...नाव वगळु नका
*लेखन :+- श्रीधर कुलकर्णी*
9665632953

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट