सहवास
*💢 सहवास 💢*
-------------------------------
एखाद्या चा सहवास खुप मोलाची गोष्ट आहे. आपल्याला कुणासोबत सहवासाची अपेक्षा आहे..हे पहिले निश्चित करावे. कारण सहवास हा संक्रमण असतो..तो जर चांगला असेल तर खुप काही शिकवतो पण जर वाईट असेल तर खुप काही बिघडवतो.सहवास कसा करावा..कुणाशी करावा..तो विश्वासपात्र आहे ना कि तात्पुरता तो चांगले पणाचे नाटक करत आहे..हे समजुन घेयला हवं...सहवासाचा परिणाम जेवढा हितकारी आहे तेवढास विध्वंसकारी.मित्र असावे चांगले नको ते व्यसनी यासाठीच म्हणले जाते.संताचा सहवास करतो जीवन हे सार्थक असेही म्हणतात. कारण सहवास हा खुप गरजेचा आहे... मित्रमंडळी,नातेवाईक ,परिवार यांचा सहवासातच माणसाचे जीवन कटिबध्द असते...तो ज्या सहवासात वावरतो तो तसा होऊन जातो.सत्संग करा जीवनाचा उध्दार करा यासाठीच म्हणले जाते.
सहवासात खुप शक्ती असते.चांगला सहवासाने जीवन मार्गी लागते.आजारी माणसाला ही प्रेमाचा सहवास त्याचे आजार बरे करण्यात मदत करत असतो.जर एखादी व्यक्ती खराब असेल .जर त्याला आपण आपल्या चांगल्या सहवासाचे ओषध दिले तर त्याचे मन परिवर्तन ही होऊ शकते.एका मंदिरात रात्री किर्तन चालु होते.एक चोर चोरी करून त्या मंदिरात जाऊन त्या साधुसंताच्या सहवासात बसतो ..पोलिस पकडु नये म्हणुन पण तिथल्या ज्ञानामृताचे चार थेंब त्याच्या कानात पडताच त्याचे मन परिवर्तित होते व आपण केलेल्या कृत्याचे त्याला विस्मरण होऊन ..त्याला पश्चात्ताप होऊ लागते.व तो सर्व समर्पण भावनेने त्या संताच्या सानिध्यात आपले पुर्ण आयुष्य घालवण्याचे निर्धारित करतो..असेच सहवासाचा परिणाम खुप शक्तीवर्धक असते.
आपल्या सहवासात कुणाचे तरी चांगले व्हावे व त्याला योग्य मार्गदर्शक मिळावं .यासाठी आपण तसे व्हायला पाहिजे.आपला सहवास इतरांसाठी लाभदायक व्हावं असे आपले वर्तन व स्वभाव तसे संघटित करायला हवं मग बघा आपल्या आजुबाजुचे,आपला समाज सुधारणा करायला वेळ लागणार नाही..आपल्या पोशाखात, वागण्यात, बोलण्यात, सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते; म्हणून संताचा सहवास नेहमी ठेवावा. चांगल्या माणसांचा सहवास ठेवावा.
=======================💢
*लेखक : श्रीधर कुलकर्णी*
९६६५६३२९५३
३०-०८-२०१७

Comments
Post a Comment