Posts

Showing posts from January, 2018

अबोला हा प्रेमाचा

   अबोला_हा_प्रेमाचा ===============💔 हा अबोला खुप जीवघेणा असतो जेव्हा एखादी प्रेमाची व्यक्ती जर आपल्याला अबोला धरून बसती काय करावं तेच कळत नाही .जीव असुन नसल्यासारखे वाटते.. जगत असुन मेल्यासारखे वाटते ..हा अबोला नको वाटत..माझ्या हृद्यातली एक विनवणी..माझ्या सखीसाठी जी अबोला धरून बसली आहे खुप बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण बोलतच नाही..  काय झालं गं तुला पिल्लु..अचानक का बरं बोलणं बंद केलीस गं..एवढा मी काय गुन्हा केला गं की तु माझ्याशी बोलणं बंद केलीस. मी काय एवढं त्रास दिला की तुला गं की तु नातच संपवायला निघालीस.नको गं अबोला धरू माझ्या शी बोल गं...काय चुकलय ते तरी सांग गं..पण अबोला नको धरू गं..खुप त्रास होतोय गं तुझ्या अबोलाच गं..जगावेसे वाटत नाही गं तुझ्या या अबोलाने..काय झालय ते तरी सांग गं..माझ्या एका शब्दावर तु धावुन येणारी..मलाच सर्वस्व मानणारी ..माझ्यातच सर्व काही पाहणारी..मला हसताना बघुन सुख मानणारी..मला उदास पाहुन मला धीर देणारी..माझ्या सुखदुखात स्वताचे आयुष्य मानणारी..काय झालं गं तुला असे की अचानक माझा हात सोडुन दिला गं..प्रेमाच्या वाटेवर दोघांनी शपथ घेतली होती...

बारा मावळे

    बारा मावळे -------------------- बारा मावळे - बारा मावळ पुण्याखाली बारा मावळ जुनराखाली असे तानाजी मालुस-याच्या पोवाडयांत म्हटले आहे. हिरडस मावळांतील बांदल देशमुखाच्या एका सनदपत्रांत (१६१४) बारा मावळे हे शब्द आहेत असे रा. राजवाडे सांगतात. शिवाजीमहारांज्याच्या वेळी जुन्नरापासून चाकणपर्यंत व पुण्यापासून शिरवळापर्यंत चोवीस मावळे प्रसिध्द होती. जुन्नरापासून चाकणपर्यंत पुढील मावळे प्रसिध्द होतीः-  (१) शिवनेर, (२) जुनेर, (३) मिननेर, (४) घोडनेर, (५) भीमनेर, (६) भामनेर, (७) जामनेर, (८) पिंपळनेर, (९) पारनेर, (१०) सिन्नर, (११) संगमनेर व (१२) अकोळनेर. ही बारा नेरे-नेहेरे उर्फ मावळे प्रसिध्द आहेत. पुण्याखालील बारा मावळे पुढीलप्रमाणे आहेत - (१) अंदरमावळ, (२) नाणेमावळ, (३) पवनमावळ, (४) घोटणमावळ, (५) पौडखोरे, (६) मोसेमावळ, (७) मुठेमावळ, (८) गुंजळमावळ, (९) वेळवंडमावळ, (१०) भोरखोरे, (११) शिवतरखोरे व (१२) हिरडसमावळ ========================= लेखन :-श्रीधर कुलकर्णी*

स्वानुभव

     स्वानुभव ------------------- नाते नाहीतर व्यवहार परस्पर विरोधी आहेत. व्यवहारात नात्याला महत्व नसते तसेच नात्यात व्यवहाराला महत्व नसते.दोघांचेही महत्व तेवढेच अहम आहे.भेद फक्त विश्वासाचा आहे..जो व्यवहार चांगला करेल अशी अाशा असते त्यात व्यवहार हा आणु नये व व्यवहारात विश्वास असेल तर नातेही दीर्घकाळ टिकते.फक्त त्या दोघांचा गोंधळ घालु नये..तुम्हाला जर विश्वास असेल की, समोरील व्यक्ती ही विश्वासपात्र आहे तर तुमच्या मनात असे व्यवहारीक भाव आणु देऊ नये ..कारण तुमच्या विश्वासाला तो कधीच तडा जाऊ देत नाही. कारण तुमच्या व त्यांच्या मध्ये एक तार आसते जी विश्वासाची असते. व हीच तार  कुठे ना कुठे विश्वासाची असावी लागते...प्रत्येक गोष्टीत हिशोब पुर्ण करून चालत नाही.समोरच्या व्यक्तीच्या स्थानाचा तरी विचार करावा लागतो तरच तुमच्याप्रती त्याची भावना समर्पित असते.जर तो विश्वासपात्र असेल तर व्यवहार हा मधे न आणता फक्त विश्वास ठेवावा.कारण तो कधी ना कधी तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला पुर्ण उतरतो व तुमचा विश्वासाला कधीच तडा जाऊ देत नाही.ज्यावेळेस अचानक व्यवहाराची भाषा मध्ये येते तेव्हा विश्...

भाग्य आणि पुरूषार्थ

    भाग्य_आणि_पुरूषार्थ ---------------------------------- भाग्य आणि पुरुषार्थ ह्या दोघांवरच संपूर्ण जगाचे कार्य उभे आहे. ह्यामध्ये पूर्वजन्मात केलेले कर्म *" भाग्य "* आणि ह्या जन्मात केलेले कर्म *" पुरुषार्थ "* समजले जाते. अशाप्रकारे एकाच कर्माचे दोन भेद केले गेले आहेत. भाग्य आणि पुरुषार्थ ह्यामधील जे दुर्बल आहे त्याला दूर करणारा नेहमी बलवान होतो. सबल आणि दुर्बल यांचे ज्ञान फलप्राप्तिने होत नाही किंवा दुसर्‍या कुठल्याच रितीने होत नाही. पुरुषार्थाच्या प्रत्यक्ष करण्याने फळाची प्राप्ती दिसत नाही, ती प्राक्तन कर्म म्हणजे पूर्व जन्मातील कर्म यांच्यावर आधारीत असतात. दुसर्‍या कशावर नाही हे निश्चित आहे. कधी कधी अगदी थोडे कर्म केल्यावर माणसाला अधिक फळ मिळते असे दिसते. पण ही गोष्ट प्राक्तनातील कर्माने होत असते. कोणी कोणी आचार्य ह्याला पुरुषार्थाने मिळालेले फळ असे मानतात. मनुष्य जो पुरुषार्थ फलप्राप्तीसाठी करतो तो ह्या जन्मातील तात्कालिक कर्माचे कारण असतो. ज्याप्रमाणे तेलाच्या दिव्याची ज्योत हवेने विझून जाऊ नये म्हणून जो प्रयत्न केला जातो त्या प्रमाणेच हा पुरुषार्थ आ...