अबोला हा प्रेमाचा

  अबोला_हा_प्रेमाचा
===============💔

हा अबोला खुप जीवघेणा असतो जेव्हा एखादी प्रेमाची व्यक्ती जर आपल्याला अबोला धरून बसती काय करावं तेच कळत नाही .जीव असुन नसल्यासारखे वाटते.. जगत असुन मेल्यासारखे वाटते ..हा अबोला नको वाटत..माझ्या हृद्यातली एक विनवणी..माझ्या सखीसाठी जी अबोला धरून बसली आहे खुप बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण बोलतच नाही..  काय झालं गं तुला पिल्लु..अचानक का बरं बोलणं बंद केलीस गं..एवढा मी काय गुन्हा केला गं की तु माझ्याशी बोलणं बंद केलीस. मी काय एवढं त्रास दिला की तुला गं की तु नातच संपवायला निघालीस.नको गं अबोला धरू माझ्या शी बोल गं...काय चुकलय ते तरी सांग गं..पण अबोला नको धरू गं..खुप त्रास होतोय गं तुझ्या अबोलाच गं..जगावेसे वाटत नाही गं तुझ्या या अबोलाने..काय झालय ते तरी सांग गं..माझ्या एका शब्दावर तु धावुन येणारी..मलाच सर्वस्व मानणारी ..माझ्यातच सर्व काही पाहणारी..मला हसताना बघुन सुख मानणारी..मला उदास पाहुन मला धीर देणारी..माझ्या सुखदुखात स्वताचे आयुष्य मानणारी..काय झालं गं तुला असे की अचानक माझा हात सोडुन दिला गं..प्रेमाच्या वाटेवर दोघांनी शपथ घेतली होती गं ..एकमेंकाच्या जवळ राहण्याचं वचन दिल होतं गं..ती शपथ ते वचन का गं विसरून गेलीस गं..काय मी एवढा त्रास दिला गं की तु आता माझं तोंडही पाहात नाहीस..ज्या तोंडाकड बघुन तुझी सकाळ होयची ..रात्र ही तिथेच पाहात होयची..मग असं काय झालं गं की तुला आता माझं तोंडही बघु वाटत नाही गं...काय केलय ते तरी सांंग ..काय चुकले असेल तर माफ कर गं तुझ्या पिल्लुला..मला लाडानं पिल्लु म्हणणारी ..कधीच एकटेपणाची जाणीव आणु न देणारी..आज अचानक मला एकांतवासात का गं सोडुन गेलीस गं..आयुष्याचा प्रवासात साथ देणार म्हणुन अर्ध्यावरती का गं उतरलीस..मला सांगावेसेही वाटलं नाही का गं तुला..मी तर तुझ्यातच जग बघायचो गं ..तुझ्यातच दिवस व रात्र ही तुझ्यातच व्हायची गं...तुझ्याशिवाय माझ्या मनात कुणाचाही विचार आला नाही गं..तुलाच सर्वस्व मानायचो..तु माझी जीवनाची प्रेरणा होतीस गं...आयुष्याची दिशा व जगायचं कारण ही तुच होतीस गं..माझी सर्वस्व होतीस गं..काय चुकलं गं माझं सांग तरी ..काय गुन्हा केला ते तरी सांग गं...हवं तर मला शिक्षा दे , वाटल्यास मार पण अबोला नको धरू गं ..सहन होत नाही गं तुझा हा अबोला..तुझ्या या अबोलाने मी जीवंत तर आहे पण जीव नसल्यासारखे झालं आहे गं..नको गं अबोला धरू..बोल गं पिल्लु ..रूसवा सोड गं.. राग नको धरू गं.. बोल गं..आता सहन होत नाही गं..जीव जाईल दं गं माझा तुझ्या अबोलाने पिल्लु ..नको एवढ सतावुस गं ..तुझ्या पिल्लुला बोल गं..एकदा समोर ये गं...माझ्या आर्तस्वरातले शब्द तुला विनवणी करीत आहे गं..त्यांच तरी एेक गं नको अबोला धरूस गं ..नको अबोला धरू गं...

                     तुझा पिल्लु...
                                श्री..
========================💔
*लेखक :- श्रीधर कुलकर्णी*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट