स्वानुभव

    स्वानुभव
-------------------

नाते नाहीतर व्यवहार परस्पर विरोधी आहेत. व्यवहारात नात्याला महत्व नसते तसेच नात्यात व्यवहाराला महत्व नसते.दोघांचेही महत्व तेवढेच अहम आहे.भेद फक्त विश्वासाचा आहे..जो व्यवहार चांगला करेल अशी अाशा असते त्यात व्यवहार हा आणु नये व व्यवहारात विश्वास असेल तर नातेही दीर्घकाळ टिकते.फक्त त्या दोघांचा गोंधळ घालु नये..तुम्हाला जर विश्वास असेल की, समोरील व्यक्ती ही विश्वासपात्र आहे तर तुमच्या मनात असे व्यवहारीक भाव आणु देऊ नये ..कारण तुमच्या विश्वासाला तो कधीच तडा जाऊ देत नाही. कारण तुमच्या व त्यांच्या मध्ये एक तार आसते जी विश्वासाची असते. व हीच तार  कुठे ना कुठे विश्वासाची असावी लागते...प्रत्येक गोष्टीत हिशोब पुर्ण करून चालत नाही.समोरच्या व्यक्तीच्या स्थानाचा तरी विचार करावा लागतो तरच तुमच्याप्रती त्याची भावना समर्पित असते.जर तो विश्वासपात्र असेल तर व्यवहार हा मधे न आणता फक्त विश्वास ठेवावा.कारण तो कधी ना कधी तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला पुर्ण उतरतो व तुमचा विश्वासाला कधीच तडा जाऊ देत नाही.ज्यावेळेस अचानक व्यवहाराची भाषा मध्ये येते तेव्हा विश्वास हा  डगमगु लागतो व आपले स्थान त्याच्या नजरेत फक्त  व्यवहारिक राहते.त्या नात्याला फक्त नावच राहते बाकी काही नाही...
-------------------------------
जसे विचार तसे आचार...
===========≠===========
*लेखक :- श्रीधर कुलकर्णी*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट