भाग्य आणि पुरूषार्थ

    भाग्य_आणि_पुरूषार्थ
----------------------------------

भाग्य आणि पुरुषार्थ ह्या दोघांवरच संपूर्ण जगाचे कार्य उभे आहे. ह्यामध्ये पूर्वजन्मात केलेले कर्म *" भाग्य "* आणि ह्या जन्मात केलेले कर्म *" पुरुषार्थ "* समजले जाते. अशाप्रकारे एकाच कर्माचे दोन भेद केले गेले आहेत.
भाग्य आणि पुरुषार्थ ह्यामधील जे दुर्बल आहे त्याला दूर करणारा नेहमी बलवान होतो. सबल आणि दुर्बल यांचे ज्ञान फलप्राप्तिने होत नाही किंवा दुसर्‍या कुठल्याच रितीने होत नाही.
पुरुषार्थाच्या प्रत्यक्ष करण्याने फळाची प्राप्ती दिसत नाही, ती प्राक्तन कर्म म्हणजे पूर्व जन्मातील कर्म यांच्यावर आधारीत असतात. दुसर्‍या कशावर नाही हे निश्चित आहे.
कधी कधी अगदी थोडे कर्म केल्यावर माणसाला अधिक फळ मिळते असे दिसते. पण ही गोष्ट प्राक्तनातील कर्माने होत असते. कोणी कोणी आचार्य ह्याला पुरुषार्थाने मिळालेले फळ असे मानतात.
मनुष्य जो पुरुषार्थ फलप्राप्तीसाठी करतो तो ह्या जन्मातील तात्कालिक कर्माचे कारण असतो. ज्याप्रमाणे तेलाच्या दिव्याची ज्योत हवेने विझून जाऊ नये म्हणून जो प्रयत्न केला जातो त्या प्रमाणेच हा पुरुषार्थ आहे.अवश्य होणार्‍या कार्याचा प्रतिकार होणे संभव नसते तेव्हा आपली बुद्धि आणि शक्तीनुसार दुष्टांचा नाश करणे कल्याणकारक होत नाही. म्हणजेच पुरुषार्थाने दुर्बल भाग्याला संपविता येते.
======================📓
श्रीधर कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट