पाऊलवाट
*पाऊलवाट*
____________
लहाणपणी रानावनात फिरताना,रानात जाण्यासाठी एक-दोन फुटाची वाट असायची .त्या वाटेवर एकच माणुस चालेल एवढीचं जागा ..तरीही गर्दी नाही,आवाज नाही ,काही नाही फक्त मी आणि माझे सवंगडी धावायचे ,चालायचो मस्त फिरायचो..या झाडाच्या चिंचा झाल्या की त्या झाडापर्यत जाण्यासाठी या पाऊल वाटा खुप गमतीशीर वाटायच्या.मातीचे रस्ते ,भोवताली गवताची चादर तर कुठे झाडाझुडपांचा मेळा ,तर कधी भरल्या रानातून तर कधी उंच सखल शिवारातून पायी जाताना या वाटा तयार होतात. पहिल्यांदा जाणारा खाच खळग्यातून, अडथळ्यातून पार गेलेल्या असतो.अश्या वाटा नागमोडी सारखे त्याला झाडाच्या फांदीप्रमाणे मधी मधी फुटलेल्या वाटा खुपच मनमोहक वाटतात.पावसाळ्यातर या वाटेला एक मोहक असे गवताची नक्षी येते व ती पाऊलवाट्याला अजुन रमणीय बनवते.मऊशीर मातीतून गेलेल्या पाऊलवाटेने अनवाणी चालताना वेगळीच मजा येते. पायाला माती गुदगुल्या करत असते. कधी ढेकळे पायाला शिवाशिवी करत असतात. ढेकळात खालीवर होणारे पाय थकवा जाणवू देत नाहीत.
तिथल्या शुध्द हवेत मन कसे आनंदी व प्रसन्न होऊन जाते.रानातल्या पाऊलवाटा ह्या जणु रानावनाचे आभुषणच वाटतात.खरचं एक दोन फुटाचे रस्त्यात खुप जागा असल्यासारखे वाटते व चालताना कसे सर्व मोकळे वाटते पण शहरातले रस्ते वीस फुटाचे असुन चालताना कसरत करावी लागते व किती जणांते धक्के आपल्याला लागतील हे सांगणे कठीणच आहे. काहीजण तर असे कट मारतात जणु काही मला कापतातच काय ..असो...
शहरी जीवनाचात भरपुर सोय झाली पण मोकळेपणा कुठे गेला देवजाणे.पण कधी कधी दीड फुटाच्या रस्त्याची अजुन आठवण येते व न कळत मन त्या रस्त्यावर घेऊन जाते.काळ कितीही बदलला तरीही आज त्या पाऊलवाटा आपले अस्तित्व टिकुन ठेवले आहे.
*खरचं त्या आठवणी व त्या आठवणी तले पाऊलवाटा*
______________________®
लेखन :- श्रीधर कुलकर्णी
स्वलिखित..... २४.०७.२०१७
९६६५६३२९५३

Comments
Post a Comment