प्रपंच व परमार्थ

प्रपंच व परमार्थ
____Shri_____


प्रपंच व परमार्थ हा दोन्हीही जीवनात केला पाहिजे .प्रत्येकाचे अनन्यसाधारण महत्व आहे.नुसता प्रपंच केला व परमार्थ नाही केला तर ते जीवन व्यर्थच आहे व नुसते परमार्थ करण्यात काहीच अर्थ नाही .जर ते समाजसेवेत उपयोगी नाही,धर्म,अर्थ, काम,मोक्ष हे साध्य झाले का पुरूषार्थ प्राप्ती होते व ती साधना मजबुत करायला कामी येते.प्रत्येक आश्रम हे महत्तपुर्ण असते.संन्यासआश्रमात गृहस्थाचे जीवन वर्ज्य आहे, पण गृहस्थाश्रमात संन्यास विरक्ती पण चालते म्हणजे संसाराची मोह ,माया ,लोभ हे दुर केले पाहीजे,संत एकनाथ महाराजांनी प्रपंच व परमार्थाची विलक्षण सांगड घालुन संसारामध्ये असतानाच परमार्थ कसा करावा याची उत्तम शिकवण दिली आहे.व प्रपंच करूनच परमार्थाकडे वळावे , गृहस्थाश्रमात राहुनच सेवा व भक्ती योग्य रूपाने होते.आधी प्रपंच नंतर परमार्थ हा रस्ताच ठेवाव व त्या रस्त्यावरच चालण्याचा प्रयत्न करावा.
संत रामदासस्वामी यावर सुंदर विवरण करतात..
*आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका । येथे आळस करू नका । विवेकी हो । । १२ -१-१*
*प्रपंच सांडून परमार्थ कराल।तेणे तुम्ही कष्टी व्हाल । प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी । । १२-१-२*
*प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिलना खायाला । मग तया करंट्याला । परमार्थ कैचा । । १२-१-३*
म्हणजे..
समर्थ आधी प्रपंच नीट करायला सांगतात ,मग परमार्थाकड़े वळायला सांगतात .कारण ते म्हणतात की प्रपंच सोडून परमार्थ केला तर तुम्ही कष्टी व्हाल कारण तुमच लक्ष सगळ प्रपंचाकड़े राहणार आहे .प्रपंचा पासून दूर जाऊन ही परमार्थ साधणार नाही .परमार्थ सोडून प्रपंच केलास तरी तू दु:खी होशील ,यमयातना भोगशील .म्हणून भगवंताची भक्ती करावी ,परमार्थाचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा .
______________________®
*लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
स्वलिखित....

Comments

Popular posts from this blog

चार देह

पाऊलवाट