Posts

Showing posts from December, 2017

प्रकृती आणि पुरूष वर्णन

   प्रकृती आणि पुरूष यांचे वर्णन ----------------------------------------- अष्टधा प्रकृति आणि क्षेत्रज्ञ या दोघांनाही तू अनादि-नित्य जाण. त्याचप्रमाणे बुद्धि, इंद्रिये, देह, इत्यादि विकारांस व सुख-दुःख-मोहरूप गुणांस तू ईश्वराच्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीपासून झालेले समज.. कार्य-शरीर व करण-सर्व इंद्रिये, यांच्या कर्तृत्वाविषयी वरील प्रकृति निमित्त आहे, असे सांगितले जाते, त्याचप्रमाणे सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाविषयी क्षेत्रज्ञ-जीव निमित्त सांगितला जातो. देहाची आरंभक-देह ज्यांच्यापासून उत्पन्न होतो ती भूते, विषय व शरीरे हे विकार हा येथील ‘कार्य’ शब्दाचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे तेरा इंद्रिये व त्यांचा आश्रय करून राहणारे सुख-दुःख-मोहात्मक गुण, हा येथील ‘करण’ शब्दाचा अर्थ आहे. त्यांचे कर्तृत्व प्रकृतीला आहे. त्यांना उत्पन्न करणे या रूपाने ती त्यांचे कारण आहे. अशा कार्य, करण, कर्तृत्वामुळे प्रकृति संसारकारण आहे. पुरुष म्ह. जीव-क्षेत्रज्ञ-भोक्ता, सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाचे निमित्त आहे. प्रकृति शरीरेंद्रियांच्या कर्तृत्वाने व पुरुष सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाने संसाराचे निमित्त ह...

विविध आहार ,यज्ञ,दान,व तप

विविध आहार यज्ञ, तप व दान -------------श्री..कु..---------------- आयुष्य, मानसबल, शारीरबल, आरोग्य, सुख व प्रीति यांची वृद्धि करणारे, रसयुक्त, स्नेहयुक्त, देहांत परिणामरूपाने चिरकाल रहाणारे व हृदयाला प्रिय वाटणारे, असे आहार सात्विक लोकांना प्रिय असतात.अति कटु, आंबट, खारट, उष्ण, तिखट, रूक्ष - नीरस व दाहक म्ह. तोंडाची आग करणारे, असे आणि दुःख, शोक व रोग देणारे आहार राजस प्रकृतीला मनुष्याला आवडतात. [ या श्लोकांत राजस लोकांना आवडणारे आहार सांगितले आहेत. ‘अति’ शब्द कटु, आंबट, खारट इत्यादि सर्वांच्या मागे जोडावा. ] अर्धे कच्चे शिजलेले, रसरहित, दुर्गंधयुक्त, शिळे, आंबलेले, वास येत असलेले, उष्टे व अपवित्र असे अन्न तामस लोकांना प्रिय असते. [ राजस व तामस आहारांचा त्याग करून सात्विक आहारांचे ग्रहण करण्यासाठी येथे तीन प्रकारचा आहार सांगितला आहे.श्री कु ] फलाची आकांक्षा न करणार्‍या लोकांकडून शास्त्राच्या विधीने प्राप्त झालेला जो यज्ञ ‘मला हा अवश्य करावयास पाहिजे’, असे मनाचे समाधान करून केला जातो, तो * सात्विक यज्ञ * आहे.शास्त्रोक्त विधीवांचून असलेला ज्यांत अन्नदान केलेले नाही, मंत्ररहित, दक्षिण...

साधनेची वाट

साधनेतील वाट -------------------- एका अनोळखी गावात जेव्हा आपण चालत असतो.तेव्हा अचानक समोर कुणीतरी येतं.व आपल्याला काही कळायच्या आत काहीतरी सांंगतो व ते कळण्याच्या आत आपण दुसरीकडे हरवुन जातो..पण तो क्षण आपण विसरून जातो.आपली साधना ही अशीच काहीतरी अचानक येऊन सांगते..आपल्याला मार्ग व रस्ता दाखवते पण तिचे सांगणे   कळले तर आपण आत्मोन्नतीच्या मार्गावर बरोबर मार्गस्थ होतो . पण जर आपण तसेच चालत राहिलो वेळोवेळी साक्षात्कार होऊन जर तिथेच घुटमळलो तर तिथेच आपले पाय जमतात न आपण एका मुर्तीस्वरूर होऊन जातो. साधना करताना तिचे घटित हे आपल्या जीवनात व आपल्या आध्यात्मिक वाटेवर कशी प्रगती होते.ते पाहाणे गरजेचे आहे.आपण जी पायरी म्हणतो त्यावर एक एक पाऊल पुढे जाणे गरजेचे आहे.व ते पाऊल योग्य मार्गावर पुढे नेल्यास आपली उन्नती आवश्य होते.फक्त येणारी जाणीव याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे व त्यावर आनुसरण करणे हे क्रमप्राप्त आहे.मग यावरील सर्व प्रश्नांचे उत्तर हे मिळत राहाते.... * चिंतन व लेखन : श्रीधर कुलकर्णी *

दासबोधामधील मायेचे वर्णन

    दासबोधामधील_मायेचे_वर्णन --------------------------------------------- समर्थ रामदासस्वामीकृत दासबोधमध्ये माया कशी आहे याचे सुंदर विवरण सांगितले आहे..याचा संदर्भ मोठा आहे . काही संदर्भ मांडायचा प्रयत्न केला आहे. माया कशी आहे ? ..ह्या प्रश्नाचे उत्तर सांगायचे म्हणलं तर  माया चंचळ आहे . ती ईश्वराच्या संगतीत असते . माया सगुण ( गुणांनी युक्त) आणि साकार आहे; ती सम्पूर्णपणे विकारी म्हणजे सतत बदलणारी आहे . माया अनेक व अनेकरूपी आहे; विश्वाच्या रूपाने ती प्रगट होते . माया बहुरूपी व बहुरंगी आहे म्हणजे बहुरूप्याप्रमाणे अनेक रंगरूपे धारण करून ती व्यक्त होते. या सृष्टीची रचना मायेमुळे होते . *मूळमाया सूक्ष्म आहे .* जसे आकाशात मुळात नसणारे आभाळ अथवा मळभ अकस्मात येते, तसे मायेमुळे ब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व दिसू लागते . जसे आकाशात प्रचंड असे धुराचे डोंगर आभाळामध्ये दिसतात, तसे ही मायादेवी विश्वरूपी अवडंबर दाखविते. ज्याप्रमाणे वायूमुळे दृश्य असणारी धूळ आकाशात उडते, त्याप्रमाणे मूळमायेमुळे दृश्य जग दिसू लागते . या विश्वाच्या 'आदि-अंती एक देव आहे'; पण *'मध्येचि लाविली माव'...

चार देह

🌸 ..  चार_देह ..🌸 -------------------------- चार देह : (१) स्थूल (२) सूक्ष्म (३) कारण आणि (४) महाकारण. हे चार देह पिंडात आहेत. *(स्थूल, सूक्ष्म, कारण महाकारण। हे च्यारी पिंडीचे देह जाण ॥९.५.४)*. यातील स्थूल व सूक्ष्म देहातील तत्त्वे आणि कारण व महाकारण या देहांचे स्वरूप हा भाग रामदासस्वामींनी पुढीलप्रमाणे सांगितला आहे. (१) पहिला स्थूल देह :-   आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी या पंच महाभूतांच्या मिश्रणाने स्थूल देह बनलेला आहे. तो चर्मचक्षूंना दिसणारा आहे. या पंचमहाभूतांचे प्रत्येकी पाच गुण आहेत. ते गुणही साहजिकच स्थूल देहात अनुभवण्यास मिळतात. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे आकाशाचे पाच गुण आहेत. चळण, वळण, प्रसारण, निरोध व आकुंचन हे वायूचे पाच गुण आहेत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे पाच गुण आहेत. शुक्र, रेत, शोणित/रक्त, लाळ, मूत्र आणि स्वेद हे आपाचे (जलाचे) पाच गुण आहेत. आणि शेवटी अस्थि, मांस, त्वचा, नाडी व रोम (ऋ केस) हे पृथ्वीचे पाच धर्म आहेत आता, प्रत्येक पाच भूतांचे पाच गुण किंवा धर्म हे प्रत्येकाचे असल्याने, एकंदर  २५ गुण किंवा धर्म या स्थूल...

भाव हा महत्वाचा

     भाव हा महत्वाचा ------------------------------- एक विषय असा असतो तो कधीच लक्षात येत नाही .पण त्याची जाणीव मात्र चेहऱ्यावर दिसुन येते . एखादा सुखद वा दुखद प्रसंग जेव्हा समोर येते तेव्हा तो पटकन चेहऱ्यावर उमटुन जातो.राग , माया, प्रेम, भिती, वा इतर सर्व प्रकारात तो दिसुन येतो पण त्यातील सखोलता लक्षात येत नाही.कारण ते कळायला त्या सोबत तसा सखोल संबंध असावा लागतो.म्हणुन तो चेहऱ्यावर असताना त्याचे महत्व आपोआप समजु लागते. कारण तो भावच असतो जो वेळोवेळी आपल्या चेहऱ्यावर प्रकट होत असतो.व त्याचे परिणाम ही त्यानुसार प्रकट होत असतात.. जसा भाव तसा देव ... या उक्ती प्रमाणे जसा भाव असतो तसेच सर्व आपल्याला दिसत असते...मुखी  जर प्रेमभाव असेल तर सर्व जग प्रेममय दिसते... या विश्वात देव ही कणकणात भरलेला आहे असा भाव ठेवल्यास तसेच ते  दिसत असते..म्हणुन हा जो भाव आहे तो सकारात्मक ठेवावा.म्हणजे जसे जग पाहाल तशी वृत्ती आपल्या अंगात वावरते.भाव हा महत्वाचा असतो व तोच जीवनात आपला स्वभाव कसा आहे तो सांगतो..व भाव हाच जिथे वसतो तिथल्या गुणाचा तो अवलंब करत असतो. तुम्ही रागीट असताल तर भा...

श्रध्दा :- विज्ञानाचा पाया

  श्रध्दा :- विज्ञानाचा पाया -------------------------------------- *कारणं विना कार्यं न सिध्यति |* असा शास्त्राचा सिद्धांत आहे.कारणाशिवाय कोणत्याही कारणाची निर्मिती होत नाही. प्रत्येक दृश्य कार्यामागे त्या कार्याचे कारण व ते कार्य निर्माण करण्यामागचे काहीतरी प्रयोजन हे असतेच. व्यवहारामध्ये आपण पाहतो की, साधी एक छोटीशी टाचणी जरी दिसत असेल तरी त्यामागे टाचणी निर्माण करणारा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. तसेच टाचणीच्या निर्मितीमागे निश्चित असे काहीतरी प्रयोजन आहे. उगीचच विनाकारण टाचणी बनविली जात नाही. त्या टाचणीचा काहीतरी विशेष उपयोग आहे. इतकेच नव्हे तर टाचणी बनविताना, ‘ती कशी असावी?’, ‘टाचणीची लांबी, जाडी, वजन, आकार कसे असावे?’, याचा व्यवस्थित विचार करूनच निर्मिती केली जाते. यावरून स्पष्ट होते की, विश्वामधील एखाद्या छोट्या वस्तुमागे सुद्धा कारण हे आहेच. तर मग हे इतके विशाल, जगड्व्याळ विश्व, निसर्ग, सूर्य-चंद्र-ग्रह-तारे-नक्षत्र हे सर्व कार्य दिसत असेल तर मग यामागे निश्चितपणे विश्वाचे काहीतरी कारण हे असलेच पाहिजे. करणं विना कार्यं न सिध्यति | कारणाशिवाय कार्य अस्तित्वातच येऊ श...

काटकसर जीवनाची

   काटकसर_जीवनाची _______Shri________ काटकसर ..या शब्दातच काट्यावर चालणे किंवा मेहनत करताना सतत काटे टोचावे असाही होतो ..या शब्दाचा अर्थ चांगला आहे का वाईट काहीच कळत नाही पण सध्या या शब्दाचा अर्थ फक्त पैसा बचत हाच धरला जातो.व त्यावर अंमल ही केला जातो ...पण खरच एकच अर्थ असु शकतो ता या शब्दाचा..नाही काटकसर या वाक्याचे बरेच अर्थ निघतात.वेळेची काटकसर,खाण्याची काटकसर,पैशाची काटकसर .. सांगायचा मुद्दा हा आहे की, आपण जी काटकसर करतो ती खरच आपल्या सुखाची आहे.अर्थातच आहे असे काहीचे मत असते. बरेच लोक पैसा पाळुन असतात.. असे एेकण्यात येते..'पैसा पाळुन असतो"म्हणजे काय काय .. तो नुसता पाळायचाच का .. त्याचा वापर म्हणजे चांगल्या कामात वापर नाही का करायचा..*पैसा,वेळ, आयुष्य हे कुणासाठीही थांबत नसतो.ते सर्व फिरतच असते.. फक्त फरकच एेवढाच की ते जिथे विश्रांती घेतात तो थांबा आपण असतो.म्हणुन पोट मारून व जीव तोडुन काटकसर करण्याला काही अर्थच नाही.जी वस्तु तुमच्याच कामात येणार नाही त्या वस्तुची काटकसर कशाला करावी.. प्रत्येक व्यक्तीने मुक्तपणे जीवन जगले पाहिजे.आपल्या अवतीभोवती संकट ,किंवा आपले सहकार्...

विश्व व प्रेममय संगीत

   🎼 विश्व व प्रेममय संगीत  🎶 ------------------------------------------------ विश्वसंगीत अनंत काळापासून सुरू आहे. विश्वाच्या उद्गात्यापासून ते अलग नाही, क्षणभरही दूर नाही. परमेश्वराचा आनंद अनंत रूपे घेऊन प्रकट होत आहे. परमात्म्याच्या हृदयाचे कंप म्हणजेच आकाशातील शतरंग. या गाण्यातील प्रत्येक सुरात पूर्णता आहे. कोणताही सूर शेवटचा नसला तरी त्यात अनंतता भरलेली आहे. विश्वाच्या या मधुर संगीताचा अर्थ न कळला म्हणून काय झाले? तारांना बोटांचा स्पर्श होताच सर्व मधुरता, स्वरसंगीत प्रकट व्हावे तसेच हे नाही का? ही सौंदर्याची भाषा आहे. आलिंगनाची भाषा आहे. ही भाषा विश्वाच्या हृदयातून बाहेर पडते व सरळ आपल्या हृदयाला येऊन भिडते. काल रात्री मी अंधारात एकटाच उभा होतो. सर्वत्र असीम निःस्तब्धता. आणि त्या विश्वकवीच मधुर गान मी ऐकले. आणि जेव्हा शय्येवर येऊन पडलो व डोळे मिटले, तेव्हा माझ्या निद्रेतही जीवनाचा नाच चालू असेल, व माझ्या शान्त शरीरातील गान विश्वसंगीताला साथ देईल, माझे हृदय नाचत राहील, नसानसांतील रक्त उसळत राहील, माझ्या शरीरातील कोट्यवधी प्राणमय परमाणू प्रभूचा स्पर्श होताच त्या...

नियंत्रण रागावर

# नियंत्रण_रागावर ..* ---------------------------- एक छोटा मुलगा होता अतिशय रागीट आणि संतापी. थोडे काही मनाविरूद्ध झाले की संतापायचा. एके दिवशी वडिलांनी त्याच्या हातात एक पिशवी दिली आणि म्हणाले, यात हातोडी आणि खिळे आहेत. तुला राग आला की, तू सरळ जायचे आणि घराला कुंपण म्हणून जी भिंत घातली आहे, त्या भिंतीवर एक खिळा ठोकायचा. पहिल्याच दिवशी त्याने ३७ खिळे ठोकले. पुढच्या काही दिवसात तो रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकला. त्याचबरोबर भिंतीवर ठोकल्या जाणाऱ्या खिळ्यांची संख्याही कमी झाली. पण त्याला जाणीव झाली की, रोज खिळे ठोकण्यापेक्षा रागावर नियंत्रण ठेवणे सोपे आहे. एक दिवस असा उजाडला की त्या मुलाला एकदाही राग आला नाही  आणि खिळा ठोकण्याची वेळ त्याच्यावर आली नाही. त्याने ही गोष्ट वडिलांना सांगितली. वडिलांनी त्याचे कौतुक केले आणि सांगितले की आता तू राग आवरलास की प्रत्येकवेळी तिथला एक खिळा काढायचा. मुलगा त्याप्रमाणे करू लागला. एके दिवशी तेथे एकही खिळा उरला नाही. मग त्याने ही बाब वडिलांना सांगितली. रागावर नियंत्रण ठेवण्याच्या गुणाचे वडिलांनी कौतुक केले. मुलगा आनंदी झाला. त्या दिवशी...

श्रध्दा

* 🔹......श्रध्दा.....🔹* -------------------------------------- या विश्वात प्रत्येक मनुष्य हा श्रध्दावान आहे.आस्तिक - धार्मिक मनुष्य श्रद्धावान आहे.  तसेच नास्तिक मनुष्यही श्रद्धावान आहे.  विज्ञानवादी व  बुद्धिनिष्ठ असणारा मनुष्यही श्रद्धावानच आहे.पापी , अधर्मी, व राक्षस सुध्दा हा श्रध्दावानच असतो फक्त त्याची श्रध्दा ही दृष्टपणा करण्यात असते.  मग यात फरक कोठे आहे? तर या सर्वांच्या श्रद्धेमध्ये फरक काहीच  नाही.  श्रद्धा ही श्रद्धाच आहे.  फक्त या सर्वांच्या श्रद्धेचे विषय भिन्न-भिन्न आहेत.  श्रद्धेचा आविष्कार भिन्न-भिन्न आहे.त्याचे फक्त प्रकार वेगळे म्हणता येईल पण त्या श्रध्देचा भाव हा एकच असतो..कोण धार्मिक दृष्टी तर कोन अधार्मिक दृष्टी प्रत्येकाची कुणावर ना कुणावर श्रध्दा असतेच. एखाद्या मनुष्याची श्रद्धा स्वतःच्या आईवडिलांच्यावर असते एखाद्याची गुरू ,परमेश्वर, शास्त्रावर, ज्ञानावर, संतपरंपरेवर, संप्रदायावर असेल तर एखाद्याची श्रद्धा पैशावर असेल या उलट एखाद्याची सत्तेवर अलते, एखाद्या प्रिय व्यक्तीवर असेल, काही वेळेस मित्र-मैत्रीण-आप्त यांच्यावर...

सेवाभाव

  सेवाभाव ------------------ “सेवा” हा मनाचा असा एक भाव आहे की, सेवा करीत असतानाच आपल्याला आनंदाचा अनुभव येतो.  सेवा ही मनापासून म्हणजेच प्रसन्न मनाने केली जाते.  सेवा करावयाची असेल तर प्रथम, ज्याची मी सेवा करतोय त्याविषयी मनामध्ये नितांत श्रद्धा, दृढ विश्वास असला पाहिजे.  त्याशिवाय मी सेवा करूच शकत नाही.  त्या श्रद्धास्थानामध्ये मी नतमस्तक झाले पाहिजे.  तिथेच माझे व्यक्तिगत रागद्वेष, आवड-नावड, हेवे-दावे गळून पडतात.  माझ्यामधील अहंकार, अभिमानाची वृत्ति त्या स्थानामध्ये गळून पडते.  तिथेच मनुष्य नम्र, विनयशील होतो.  तिथेच पूर्णभावाने समर्पित होतो.  मग ते स्थान कोणतेही असो.  मातृसेवा, पितृसेवा, गुरुसेवा, राष्ट्रसेवा, ईश्वराची सेवा यांपैकी कोणतीही सेवा असेल.  आई वडीलांची सेवा करणारे वा देशाची सेवा करणारे थोर विर पुत्र हे आपल्यासमोर उदाहरणे आहेच.सेवा करताना निष्काम भावनेतुनच करावी तरच ती सेवा मानली जाते... पुर्ण समर्पित भावनेने सेवा करावी. सेवा करताना आपणास व्यावहारिक दृष्टीने कितीही निकृष्ठ कर्म करावे लागले तरी आपल्याला त्याची...

नात्याला ताजेपणा द्या

* नात्याला ताजेपणा द्या..! * ------------------------------------- कोणतीही गोष्ट शाश्वत नसते असे म्हटले जाते. नात्याच्या बाबतीतही हे खरे आहे. सुरुवातीला प्रेमाच्या नात्यामध्ये आपुलकी, जिव्हाळा, ओढ, काळजी या सर्व भावना ओतप्रोत भरलेल्या असतात. काळ पुढे सरकतो तशा या भावना हळूहळू बोथट होऊ लागतात. एकमेकांबद्दल क्षणोक्षणी विचार करणार्‍या पती-पत्नीचे एकमेकांकडे दुर्लक्ष होऊ लागते. हे केवळ पती-पत्नीच्या बाबतीत नव्हे तर प्रियकर-प्रेयसीच्या बाबतीतही घडते. स्त्रिया जास्त भावूक असल्याने त्याचे आपल्यावर पूर्वीसारखे प्रेम उरलेले नाही हा विचार त्यंना सतातवत राहतो. मात्र, नात्याचा हा तिढा कसा सोडवावा हे उमगत नाही. पतीचे आपल्यावरील प्रेम पूर्णपणे संपुष्टात आलेले नसले तरी ते कमी झाले आहे, हे वारंवार जाणवते. अशा वेळी डोके धरुन बसण्यात काय अर्थ आहे? चला, नात्याला थोडा ताजेपणा देऊ या! नात्यात तोचतोचपणा येण्याला दोघेही जबाबदार असतात. दोघांना एकमेकांना सतत दोष देण्याची सवय लागलेली असते. वारंवार दोष दिल्याने एकमेकेंबद्दल द्वेष निर्माण होऊ लागतो. हे टाळण्यासाठी सर्वप्रथम दोष देणे थांबवले पाहिजे. आपली चूक...