भाव हा महत्वाचा

    भाव हा महत्वाचा
-------------------------------

एक विषय असा असतो तो कधीच लक्षात येत नाही .पण त्याची जाणीव मात्र चेहऱ्यावर दिसुन येते . एखादा सुखद वा दुखद प्रसंग जेव्हा समोर येते तेव्हा तो पटकन चेहऱ्यावर उमटुन जातो.राग , माया, प्रेम, भिती, वा इतर सर्व प्रकारात तो दिसुन येतो पण त्यातील सखोलता लक्षात येत नाही.कारण ते कळायला त्या सोबत तसा सखोल संबंध असावा लागतो.म्हणुन तो चेहऱ्यावर असताना त्याचे महत्व आपोआप समजु लागते. कारण तो भावच असतो जो वेळोवेळी आपल्या चेहऱ्यावर प्रकट होत असतो.व त्याचे परिणाम ही त्यानुसार प्रकट होत असतात.. जसा भाव तसा देव ... या उक्ती प्रमाणे जसा भाव असतो तसेच सर्व आपल्याला दिसत असते...मुखी  जर प्रेमभाव असेल तर सर्व जग प्रेममय दिसते... या विश्वात देव ही कणकणात भरलेला आहे असा भाव ठेवल्यास तसेच ते  दिसत असते..म्हणुन हा जो भाव आहे तो सकारात्मक ठेवावा.म्हणजे जसे जग पाहाल तशी वृत्ती आपल्या अंगात वावरते.भाव हा महत्वाचा असतो व तोच जीवनात आपला स्वभाव कसा आहे तो सांगतो..व भाव हाच जिथे वसतो तिथल्या गुणाचा तो अवलंब करत असतो. तुम्ही रागीट असताल तर भाव रागीट होतात ,तुम्ही प्रेमळ असाल तर भाव हा प्रेमळ होऊन जातो...म्हणुन प्रेम हे अंगीकृत बाळगा , भक्ती अंगी वावरू द्या मग बघा जसा भाव तसा देव ही उक्ती कशी सार्थक होते ते.....
========================♦
अधिकृत लेखन .
*✍🏻स्वयंलिखित :- श्रीधर कुलकर्णी*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट