साधनेची वाट

साधनेतील वाट
--------------------

एका अनोळखी गावात जेव्हा आपण चालत असतो.तेव्हा अचानक समोर कुणीतरी येतं.व आपल्याला काही कळायच्या आत काहीतरी सांंगतो व ते कळण्याच्या आत आपण दुसरीकडे हरवुन जातो..पण तो क्षण आपण विसरून जातो.आपली साधना ही अशीच काहीतरी अचानक येऊन सांगते..आपल्याला मार्ग व रस्ता दाखवते पण तिचे सांगणे   कळले तर आपण आत्मोन्नतीच्या मार्गावर बरोबर मार्गस्थ होतो . पण जर आपण तसेच चालत राहिलो वेळोवेळी साक्षात्कार होऊन जर तिथेच घुटमळलो तर तिथेच आपले पाय जमतात न आपण एका मुर्तीस्वरूर होऊन जातो. साधना करताना तिचे घटित हे आपल्या जीवनात व आपल्या आध्यात्मिक वाटेवर कशी प्रगती होते.ते पाहाणे गरजेचे आहे.आपण जी पायरी म्हणतो त्यावर एक एक पाऊल पुढे जाणे गरजेचे आहे.व ते पाऊल योग्य मार्गावर पुढे नेल्यास आपली उन्नती आवश्य होते.फक्त येणारी जाणीव याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे व त्यावर आनुसरण करणे हे क्रमप्राप्त आहे.मग यावरील सर्व प्रश्नांचे उत्तर हे मिळत राहाते....

*चिंतन व लेखन : श्रीधर कुलकर्णी*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट