प्रकृती आणि पुरूष वर्णन
प्रकृती आणि पुरूष यांचे वर्णन
-----------------------------------------
अष्टधा प्रकृति आणि क्षेत्रज्ञ या दोघांनाही तू अनादि-नित्य जाण. त्याचप्रमाणे बुद्धि, इंद्रिये, देह, इत्यादि विकारांस व सुख-दुःख-मोहरूप गुणांस तू ईश्वराच्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीपासून झालेले समज..
कार्य-शरीर व करण-सर्व इंद्रिये, यांच्या कर्तृत्वाविषयी वरील प्रकृति निमित्त आहे, असे सांगितले जाते, त्याचप्रमाणे सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाविषयी क्षेत्रज्ञ-जीव निमित्त सांगितला जातो. देहाची आरंभक-देह ज्यांच्यापासून उत्पन्न होतो ती भूते, विषय व शरीरे हे विकार हा येथील ‘कार्य’ शब्दाचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे तेरा इंद्रिये व त्यांचा आश्रय करून राहणारे सुख-दुःख-मोहात्मक गुण, हा येथील ‘करण’ शब्दाचा अर्थ आहे. त्यांचे कर्तृत्व प्रकृतीला आहे. त्यांना उत्पन्न करणे या रूपाने ती त्यांचे कारण आहे. अशा कार्य, करण, कर्तृत्वामुळे प्रकृति संसारकारण आहे. पुरुष म्ह. जीव-क्षेत्रज्ञ-भोक्ता, सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाचे निमित्त आहे. प्रकृति शरीरेंद्रियांच्या कर्तृत्वाने व पुरुष सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाने संसाराचे निमित्त होतो. सुख-दुःखांचा साक्षात्कार हाच अविक्रय आत्म्याचा म्ह. द्रष्ट्याचा संसार व तशा प्रकारचे भोक्तृत्व हेच त्याचे संसारित्व होय.
कारण पुरुष इंद्रियांच्या रूपाने परिणत झालेल्या-शरीरेंद्रियाकार प्रकृतीत स्थित होऊन, हा शरीरेंद्रियसंघातच मी, असे मानून प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सुख-दुःख-मोहात्मक गुणांस भोगतो, त्यांचा अनुभव घेतो. या भोक्त्याची गुणांवरील आसक्ति हाच त्याचा देवादि ‘सत् योनि’ व पश्वादि ‘असद्योनि’ यांत जन्म होण्याचे कारण आहे. [ अविद्या हे संसाराचे उपादान कारण असून ‘गुणसंघ’ निमित्तकारण आहे. *'सदसद्योनि’* या शब्दाने मनुष्यांतीलही उत्तम-अधम योनि व्याख्या.
समीप राहून पहाणारा, अनुमोदन देणारा आणि भरण-पोषण करणारा, भोग घेणारा, सर्व ईश्वरांचाही ईश्वर, ‘परमात्मा’ असेही पण बोलला गेलेला परमपुरुष या देहांत आहे. उपद्रष्टा’ यांतील ‘उप’ या उपसर्गाचा ‘सामीप्य’ हा अर्थ आहे. त्यामुळे उपद्रष्टा म्ह. समीप स्थित होऊन पहाणारा, पण हा पुरुष लौकिक उपद्रष्ट्याप्रमाणे स्वतः काही व्यापार करीत नाही. त्यामुळे यजमान व ऋत्विक यांच्या यज्ञकर्मातील गुण किंवा दोष यांस समीप बसून पहाणारा सर्व यज्ञकुशल विद्वान् जसा सर्व जाणतो, त्याप्रमाणे हा चिन्मात्रस्वभाव आत्मा सर्व पहातो म्हणून तो उपद्रष्टा होय किंवा देह, चक्षु, मन, बुद्धि व आत्मा हे पांच द्रष्टे आहेत. त्या सर्वांत बाह्यद्रष्टा देह आहे व सर्वांच्या आतील द्रष्टा आत्मा आहे. तोच प्रत्यक् म्ह. अगदी समीप आहे. अर्थात् प्रत्यगात्मा हाच उपद्रष्टा होय. ‘अनुमन्ता’ म्हणजे अनुमोदन देणारा. शरीरेंद्रिये आपापल्या व्यापारामध्ये प्रवृत्त झाली असता साक्षी आत्मा त्यांचे निवारण करीत नाही, म्हणून तो अनुमन्ता. आपल्या चिदाभासाने शरीर-इंद्रिये-मन व बुद्धि यांचे पोषण करतो. त्यांना परस्पर संबद्ध करतो, म्हणून तो ‘भर्ता’. बुद्धिचे सर्व विषयानुभव आत्मचैतन्याने व्याप्त असेच उत्पन्न होत असलेले दिसतात. कारण चैतन्याच्या व्याप्तीवाचून त्यांचा अनुभवच संभवत नाही. म्हणून तो ‘भोक्ता’. सर्व ईश्वरांचाही ईश्वर, म्हणून ‘महेश्वर’ व देहादि मिथ्या आत्म्याहून श्रेष्ठ, म्हणून तो ‘परमात्मा’ आहे. ‘उपद्रष्टा’ इत्यादि विशेषांनी युक्त असलेला तो या देहांत व्यक्त होतो.
जो याप्रकारे पुरुषाला व गुणांसह प्रकृतीला जाणतो, तो कसाही जरी वागत असला तरी पुनरपि उत्पन्न होत नाही. पूर्वोक्त आत्म्याला ‘हाच मी’ असे जो जाणतो व गुणांसह म्ह. स्वविकारांसह ज्ञानाने निवृत्त केलेल्या प्रकृतीला, ब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या योगाने कार्यांसह अविद्येचा अभाव आहे, असे जो जाणतो, तो सर्वथा - विहित किंवा निषिद्ध आचरणाने जरी वागत असला तरी ज्या शरीरांत ज्ञान झाले, ते शरीर मृत झाले असतां पुनः उत्पन्न होत नाही, मग जो नियमाने सदाचरणसंपन्न असतो, तो उत्पन्न होणार नाही हे काय सांगावे ?
=======================📕
*चिंतन :- श्रीधर कुलकर्णी*

Comments
Post a Comment