दासबोधामधील मायेचे वर्णन

    दासबोधामधील_मायेचे_वर्णन
---------------------------------------------

समर्थ रामदासस्वामीकृत दासबोधमध्ये माया कशी आहे याचे सुंदर विवरण सांगितले आहे..याचा संदर्भ मोठा आहे . काही संदर्भ मांडायचा प्रयत्न केला आहे.

माया कशी आहे ? ..ह्या प्रश्नाचे उत्तर सांगायचे म्हणलं तर  माया चंचळ आहे . ती ईश्वराच्या संगतीत असते . माया सगुण ( गुणांनी युक्त) आणि साकार आहे; ती सम्पूर्णपणे विकारी म्हणजे सतत बदलणारी आहे . माया अनेक व अनेकरूपी आहे; विश्वाच्या रूपाने ती प्रगट होते . माया बहुरूपी व बहुरंगी आहे म्हणजे बहुरूप्याप्रमाणे अनेक रंगरूपे धारण करून ती व्यक्त होते. या सृष्टीची रचना मायेमुळे होते . *मूळमाया सूक्ष्म आहे .*

जसे आकाशात मुळात नसणारे आभाळ अथवा मळभ अकस्मात येते, तसे मायेमुळे ब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व दिसू लागते . जसे आकाशात प्रचंड असे धुराचे डोंगर आभाळामध्ये दिसतात, तसे ही मायादेवी विश्वरूपी अवडंबर दाखविते. ज्याप्रमाणे वायूमुळे दृश्य असणारी धूळ आकाशात उडते, त्याप्रमाणे मूळमायेमुळे दृश्य जग दिसू लागते . या विश्वाच्या 'आदि-अंती एक देव आहे'; पण *'मध्येचि लाविली माव'*  आहे. विश्वाच्या 'मूळपासून सेवटवरी । अवघी मायेची भरोवरी' आहे. सृष्टिभान हा मायेचा स्वभाव आहे . या विश्वात *'माया आहे मायापणे । विस्तारली'  किंवा 'अवघी माया विस्तारली'* आहे. दृष्टीला जे दृश्य दिसते आणि जो भास मनाला भासतो ते दोन्ही माया आहेत . माया म्हणजे पंचभूतांचा विस्तार आहे . मायेच्या विस्ताराला मर्यादा नाही .

स्थूल पंच महाभूतांना माया चेतविते . विश्वातील नाम आणि रूप मायेमुळे आहे .विश्वातील अनुभव आणि अनुभव घेणारा हे द्वैत मायेमुळे आहे . जगातील मंत्रमाळा, इत्यादि सर्व माया आहे  संसारातील तारूण्य, वैभव, हावभाव, सोहाळे हे सर्व मायिक माया (फसवा देखावा, भ्रम) आहे
=======================
*चिंतन व लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
*पांडुरंग हरी समुह*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट