श्रध्दा

*🔹......श्रध्दा.....🔹*
--------------------------------------

या विश्वात प्रत्येक मनुष्य हा श्रध्दावान आहे.आस्तिक - धार्मिक मनुष्य श्रद्धावान आहे.  तसेच नास्तिक मनुष्यही श्रद्धावान आहे.  विज्ञानवादी व  बुद्धिनिष्ठ असणारा मनुष्यही श्रद्धावानच आहे.पापी , अधर्मी, व राक्षस सुध्दा हा श्रध्दावानच असतो फक्त त्याची श्रध्दा ही दृष्टपणा करण्यात असते.  मग यात फरक कोठे आहे?
तर या सर्वांच्या श्रद्धेमध्ये फरक काहीच  नाही.  श्रद्धा ही श्रद्धाच आहे.  फक्त या सर्वांच्या श्रद्धेचे विषय भिन्न-भिन्न आहेत.  श्रद्धेचा आविष्कार भिन्न-भिन्न आहे.त्याचे फक्त प्रकार वेगळे म्हणता येईल पण त्या श्रध्देचा भाव हा एकच असतो..कोण धार्मिक दृष्टी तर कोन अधार्मिक दृष्टी प्रत्येकाची कुणावर ना कुणावर श्रध्दा असतेच.
एखाद्या मनुष्याची श्रद्धा स्वतःच्या आईवडिलांच्यावर असते एखाद्याची गुरू ,परमेश्वर, शास्त्रावर, ज्ञानावर, संतपरंपरेवर, संप्रदायावर असेल तर एखाद्याची श्रद्धा पैशावर असेल या उलट एखाद्याची सत्तेवर अलते, एखाद्या प्रिय व्यक्तीवर असेल, काही वेळेस मित्र-मैत्रीण-आप्त यांच्यावर असेल तर एखाद्याची वाईट मार्गावरचे साधनावर असते. काही वेळेस एखाद्याची श्रद्धा स्वतःवर, स्वतःच्या कर्तृत्वावर असते त्यालाच आपण आत्मविश्वास हा शब्द वापरतो – *आत्मविश्वास म्हणजेच स्वतःची स्वतःवर असलेली श्रद्धा होय.*  याप्रमाणे श्रद्धेचे विषय बदलतील.  परंतु श्रद्धेचा भाव सर्वांच्यामध्ये स्थायी आहे.  सर्वांच्यामध्ये ‘श्रद्धा’ आहे.फक्त त्या श्रध्देचे स्वरूप व प्रकार वेगळे आहेत .. त्यातील भाव हा एकच असतो.श्रध्दा ही स्वच्छ राहातो.फक्त ती योग्य मार्गावर राहावी.काही ठिकाणी श्रध्दा या शब्दाचा अतिरेक होतो व अंधश्रध्दा जन्माला येते...श्रध्दा ही मर्यादित व संतुलित राहावी त्या श्रध्देचा अतिरेक हा वाईट असतो..श्रध्दा कुठलीही असो भाव हा एकच राहातो..
=======================♦
*चिंतन व लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
०५-१२-२०१८:१२१९८९-१२
*स्वयंलिखित*:- नावासहित पुढे पाठवा ..तेवढेच तात्विक समाधान.. बाकी आपली नीतिमत्ता...धन्यवाद...

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट