श्रध्दा :- विज्ञानाचा पाया
श्रध्दा :- विज्ञानाचा पाया
--------------------------------------
*कारणं विना कार्यं न सिध्यति |* असा शास्त्राचा सिद्धांत आहे.कारणाशिवाय कोणत्याही कारणाची निर्मिती होत नाही. प्रत्येक दृश्य कार्यामागे त्या कार्याचे कारण व ते कार्य निर्माण करण्यामागचे काहीतरी प्रयोजन हे असतेच.
व्यवहारामध्ये आपण पाहतो की, साधी एक छोटीशी टाचणी जरी दिसत असेल तरी त्यामागे टाचणी निर्माण करणारा कोणीतरी करता हा असलाच पाहिजे. तसेच टाचणीच्या निर्मितीमागे निश्चित असे काहीतरी प्रयोजन आहे. उगीचच विनाकारण टाचणी बनविली जात नाही. त्या टाचणीचा काहीतरी विशेष उपयोग आहे. इतकेच नव्हे तर टाचणी बनविताना, ‘ती कशी असावी?’, ‘टाचणीची लांबी, जाडी, वजन, आकार कसे असावे?’, याचा व्यवस्थित विचार करूनच निर्मिती केली जाते.
यावरून स्पष्ट होते की, विश्वामधील एखाद्या छोट्या वस्तुमागे सुद्धा कारण हे आहेच. तर मग हे इतके विशाल, जगड्व्याळ विश्व, निसर्ग, सूर्य-चंद्र-ग्रह-तारे-नक्षत्र हे सर्व कार्य दिसत असेल तर मग यामागे निश्चितपणे विश्वाचे काहीतरी कारण हे असलेच पाहिजे. करणं विना कार्यं न सिध्यति | कारणाशिवाय कार्य अस्तित्वातच येऊ शकत नाही. या न्यायाप्रमाणे विश्वाच्या निर्मितीमागे कारण हे आहेच.
तेच विश्वनिर्मितीचे कारण शोधण्याचा आज विज्ञान सुद्धा कसोशीने प्रयत्न करीत आहे. विज्ञान जर विश्वाच्या कारणाचा शोध घेत असेल तर निश्चितपणे विश्वाच्या मागील कारणाचे अस्तित्व विज्ञानाने मान्य केले आहे, हेच सिद्ध होते. विज्ञानाने त्या कारणाच्या अस्तित्वावर प्रथम विश्वास ठेवला. म्हणजेच श्रद्धा ठेवली. श्रद्धा ठेवल्यावरच विश्वाच्या अज्ञात कारणाच्या शोधास प्रारंभ झाला. म्हणून अज्ञाताच्या शोधामध्ये श्रद्धेनेच प्रारंभ होत असून श्रद्धा हाच विज्ञानाच्या सर्व शोधांचा पाया आहे. आधार अधिष्ठान आहे.
=====================📕
*श्रीधर कुलकर्णी*
*📚ज्ञानामृत मंच ग्रुप*📚

Comments
Post a Comment