सेवाभाव

  सेवाभाव
------------------

“सेवा” हा मनाचा असा एक भाव आहे की, सेवा करीत असतानाच आपल्याला आनंदाचा अनुभव येतो.  सेवा ही मनापासून म्हणजेच प्रसन्न मनाने केली जाते.  सेवा करावयाची असेल तर प्रथम, ज्याची मी सेवा करतोय त्याविषयी मनामध्ये नितांत श्रद्धा, दृढ विश्वास असला पाहिजे.  त्याशिवाय मी सेवा करूच शकत नाही.  त्या श्रद्धास्थानामध्ये मी नतमस्तक झाले पाहिजे.  तिथेच माझे व्यक्तिगत रागद्वेष, आवड-नावड, हेवे-दावे गळून पडतात.  माझ्यामधील अहंकार, अभिमानाची वृत्ति त्या स्थानामध्ये गळून पडते.  तिथेच मनुष्य नम्र, विनयशील होतो.  तिथेच पूर्णभावाने समर्पित होतो.  मग ते स्थान कोणतेही असो.  मातृसेवा, पितृसेवा, गुरुसेवा, राष्ट्रसेवा, ईश्वराची सेवा यांपैकी कोणतीही सेवा असेल.  आई वडीलांची सेवा करणारे वा देशाची सेवा करणारे थोर विर पुत्र हे आपल्यासमोर उदाहरणे आहेच.सेवा करताना निष्काम भावनेतुनच करावी तरच ती सेवा मानली जाते... पुर्ण समर्पित भावनेने सेवा करावी.
सेवा करताना आपणास व्यावहारिक दृष्टीने कितीही निकृष्ठ कर्म करावे लागले तरी आपल्याला त्याची लाज वाटता कामा नये.  काया-वाचा-मनाने झोकून देऊन सेवा केली पाहिजे.  माझे प्रत्येक कर्म मी सेवेसाठीच केले पाहिजे.अशी धारणा व संकल्प आपण धरला पाहिजे.
======================
*अधिकृत लेखन:- श्रीधर कुलकर्णी*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट