भगवंत अवतार गुढ मत

भगवंतांचा अवतार व त्यासंबंदीत प्रश्न हे काही अंशी गूढ च असतात कधी सांगण्यात फरक तर माहीतीत बदल असू शकतो, भगवंतांचा जन्म व मृत्यू ही सर्व माया असती, ती न समजण्यासारखी आहे व फक्त त्या विषयाचा आनंद घेणे हाच जीवनामृत आहे.

देवांचा जन्म होतो हे वेदांमध्ये उल्लेख असतो पण तो कसा जन्म घेतो हे प्रश्न गूढ आहे व अनंत जन्माचे चिंतन ही पुरेसे नाही. आपण फक्त जे वेदात व शास्त्रात दिले आहे. त्याचाच आधार घेऊ शकतो याव्यतिरिक्त दूसरे व्यक्तव्य व विधान आपण सांगावे हे उचित नाही व त्यास काही आपण पुरावा निशी सिध्द ही करू शकत नाही

संपूर्ण विश्व व त्याची माहीती वेदपुराणात मिळते पण असे किती ब्रम्हांड देवात विराजमान असतात व त्याचा वेदांनाही त्याचा थांगपत्ता लागत नाही.

*वेदांनाही नाही कळला, अंतपार, याचा कानडा राजा पंढरीचा*

थोडक्यात सांगायचे तर आपण फक्त वेदपुराणानुसार देवाचे अवतार वर्णन करू शकतो पण तो कसा झाला हे अशक्य आहे, व हे एका जन्मात शक्यही नाही.देवाचे नाम घेयला पण अनंत जन्माचे पुण्य लागते, *ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय.*

©®  श्रीधर कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट