आधी वंदावे गुरू

  आधी वंदावे गुरू..
---------------------------

आपल्या जीवनात गुरूचे महत्व म्हणजे या देहाला जसे प्राणाचे .. साधना,भक्ती,जी कर्मे असतात.ते गुरू शिवाय पुर्ण होत नाही..कितीही ज्ञानी ,पंडित जरी असला तरी त्याचे सर्व व्यर्थ ज्ञान  आहे.गुरू हा आपल्या साधनेतील अहंकार दुर करतो.त्यांनी वाट दाखवलेले रस्त्यावर चालत राहील्यास तो मोक्षापर्यत घेऊन जातो. कितीही अडचणी जरी आले तरी गुरूचा वरदहस्त हा जखमेवरील मलमाप्रमाणे वाटतो व साधनेत अजुन दृढता येते म्हणुन म्हणतात..

*गुरुविण कोण दाखविल वाट*
*आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर-घाट*

म्हणुन साधना करताना गुरू करून जर केली तर ती लवकर फलद्रुप होते . शिष्यानेही गुरू हा सर्वोपरी समजुन पुजा करावी . गुरूचा हात जर डोक्यावर असेल तर ईश्वराचा कोपसुध्दा शिष्याला लागत नाही ..देव जर कोपला तर गुरू वाचवितो पण गुरू जर कोपला तर या समस्त ब्रह्मांडी सुध्दा तुम्हाला कोणी वाचवु शकत नाही.गुरूचा शब्द ,वचन,राग हे सर्व मुक्तीचे दारे असतात.शिष्याने फक्त त्याला धरावे व त्यादारापर्यत चालावे .
  संत शिरोमणी तुलसीदास सुंदर शब्दात सांगतात :-
*गुर बिनु भवनिधि तरइ न कोई।*
*जों बिरंचि संकर सम होई।।*

गुरूमध्ये सर्व देव वास करतात.त्यांच्याजवळ .. कोणतेही विकार फिरकत नाहीत व ते आपल्या शिष्याजवळही फिरकु देत नाही.. शिष्याचेही कर्तव्य आहे की,त्याने पुर्ण समर्पण भाव ठेवुन गुरूभक्ती करावी व गुरूआज्ञा हेच जीवन समजुन गुरूप्रती समर्पित राहावे .
〰〰〰〰〰〰〰📕
*लेखन🖊 :-श्रीधर कुलकर्णी*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट