आजचे युग व प्रेमाची नाती
आजचे युग व प्रेमाची नाती
________Shri________
कधी वाटतं हे काय चालु आहे ..अवतीभोवती वातावरण कसे आहे..जिकडेतिकडे धावपळ ,गडबड नुसते घड्याळाचे चक्र फिरावे तसे सारखे पाय फिरत असतात..नाही कुठे थांबा तर नाही कुठे विश्रांती..नुसते पळायचे .. पळत पळत सुटायचे मागे काय राहिले आहे काय सुटले आहे कशाचीही काळजी नाही. फक्त पळायचं .जिंदगी ही एक चलती गाडी प्रमाणे सुटायचं..याला आजच्या युगातले जीवन म्हणायचे व मागील सुखाकडे दुर्लक्ष करायचे व वेळोवेळी भेटणाऱ्या सुखापासुन वंचित होयचे..याला आजच्या युगातले जीवन म्हणायचे का ?.. पळतापळता कुठेतरी धरपटडे जाते..नाहीतर कधीकधी रस्ता चुकले जाते.. विचार करण्यासाठीही वेळ मिळत नाही ..हेच का आजच्या युगातले जीवन म्हणायचे का ?..
आयुष्य जगावे असे त्यात मिळावे सगळे फळे ,कधी गोड कधी .कडु तर कधी आंबट तर कधी तिखट ..सर्व रसाची चव चाखुन पुढे जावे.. जीवन हे एकदाच मिळते..क्षणाक्षणाला ते जगले पाहिजे..कसाही असेल क्षण तो आत्मसात केला पाहिजे..एका रस्त्यावर धावण्याच्या नादात आपण सुखाचे रस्ते सोडुन देतो ..इकडेतिकडे न बघती सुसाट पळत सुटतो.प्रेम,नाती,सुख शांती, हे रस्ते विसरून फक्त एकाच रस्त्याच्या नादात राहातो . मग वेळ गेल्यावर त्या रस्त्याची आठवण येते व आपले पावले तिकडे वळते ,पण आपण खुप दुर आलो आहे हे कळल्यावर पश्चात्तापाची अग्नी जाळु लागते.म्हणुन प्रत्येक क्षण हा सर्वासोबत मिळुन जगला पाहिजे व तो क्षण जपला पाहिजे. _वेळोवेळी मैत्रीचे ओढ,आईवडीलांची माया,पत्नीचे प्रेम,व आपले शांतीचे क्षण हे सर्वच जगत आले पाहिजे.._ यातील एक जरी बाजु कमकुवत असेल तर गाडी कशी चालणार नाही का ?..
जगावे असे सुंदर क्षण | त्यात असावे प्रेमाचे व शांतीचे धुन..
नुसती धावपळीने या युगाचे काही होणार नाही पण आपले क्षण वाया जातात.युग कोणतेही असो त्यात असे जगले पाहिजे की इथेच स्वर्ग निर्माण झाले पाहिजे.म्हणुन वाटेत येणाऱ्या किरकोळ सुखाकडे कानाडोळा न करता तो जगला पाहिजे व सर्वांबरोबर प्रेमाने राहिले पाहिजे. *आयुष्य जाते काट्यावर |राहाते आठवणी ओट्यावर* असे होऊ नये.
हसा ,खेळा ,आनंदाने जगा..युग कोणतेही असो त्यात आपल्या युगाची सुरूवात करा व धावपळी बरोबर .. याकडे ही लक्ष द्या..
*युगाची नाती जुळती..जुळतात बंध रेशमाचे..या धावपळीच्या जीवनात..विसरून कसे चालेल.. एक क्षण ही त्याच्या सोबत..मिळे सुख शांती चे अमृत .. हे बरोबर असतील तर प्रत्येक युगात घडेल..प्रेमाचे हे रसपान..*
_____________________®
*लेखन:- श्रीधर कुलकर्णी*
© स्वलिखित..नाव खोडु नये

Comments
Post a Comment