जीवनात संयम हवा

*जीवनात संयम हवा ?*
________Shri________

प्रत्येकाच्या जीवनात संयम हवाच.संयम ही यशाला शिखरावर नेऊन बसवते.घर असो की आॅफिस, वा शत्रु ..वार्तालाप करताना संयम हवा... आपण जे बोलतो ,वागतो,ते सर्व संयमित हवे.आयुष्यात संयमाला अनन्यसाधारण महत्वा आहे. जीवनात जर संयम नसेल तर क्रोध हा आपल्याला गिळंकृत करतो व आपण त्याचे गुलाम होतो,यासाठी रागावर संयम हवा..

नुसता रागावरच नाही तर खाण्यावर ,बोलण्यावर ,आचरणावर,पुजेत ,साधनेत संयम हवा...
जर आपल्यात संयम असेल तर आपले जीवन सफल व यशस्वी होते.बोलताना आपण काय बोलतो ,कसे बोलतो,आपल्या बोलण्याने समोरील व्यक्ती नाराज नाही होणार याची काळजी घ्यावी .आपल्या बोलण्यात संयम असायला हवा.जर एखादा आपल्याला वाईट बोलत आहे . तर आपण त्या पातळीवर न जाता संयमाने त्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. म्हणुन हाव भाव, बोलण्यात संयम हवा..

संयमित जीवन हे मधासारखे असते..आपण जर संयमित असेल तर कोणतेही परिस्थिती आपण सहज हाताळु शकतो.संयम हा अनमोल दागिना आहे जो प्रत्येकात असतो फक्त आपल्या धैर्याने तो कार्यान्वित होतो. *संयम असेल मनी..तो बोलण्याचा धनी*

आपले आचरण नेहमी संयमित असावे व आपल्यामुळे कुणी दुखवु नये व त्याचा अपमान होईल असे वागु नये व आपल्या या वागण्याय संयम ही भुमिका महत्वाची ठरते व संयमाने सर्व शांतस्वरूप होते.

आपले संत,ऋषी यांना समाजकंटकानी भरपुर त्रास दिला  पण त्यांनी प्रत्युत्तर न देता संयमाची शक्ती बाळगली व तेच.समाजकंटक पुन्हा त्यांच्याच चरणी नतमस्तक झाले ही आहे संयमाची महिमा....संयम आपल्या जीवनात महत्वपुर्ण आहे..आपला जर मनावर संयम असेल तर आपली आध्यात्मिक साधना ही एकाग्रता व चित्त स्थिर राहण्यात संयम हा महत्वाची भुमिका पार पाडतो...

म्हणुन श्रीमद् भगवद् गीतेत पण कृष्णपरमात्मा सांगतो की,

*मनी संयमित राहुनि करि जो कर्मप्रारंभ |*
*निश्रित होतो खास प्रतिष्ठेचा त्याला लाभ ||*
______________________®
लेखन. :- श्रीधर कुलकर्णी*
९६६५६३२९५३
स्वलिखित....नाव खोडु नका

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट