नमस्काराचा महिमा

🙏नमस्काराचा महिमा 🙏

……………………………
दररोज सकाळ - संध्याकाळ माता -पिता आणि गुरूजनांना नमस्कार केला पाहिजे, नमस्काराचा अपार महिमा आहे,

*"अभिवादनशिलस्य नित्यं वृध्दोपसेविन :।"*
*"।चत्वारी तस्य वर्ध्दन्ते आयुर्विद्यायशोबलम।।"*

जो दररोज वडिलधार्याची सेवा करतो, त्यांना नमस्कार करतो आणि त्यांच्या शिकवणीनुसार वर्तन करतो त्याचे आयुष्य,विद्या, यश, आणि बळ चारही वाढते, एक सुंदर कथा सांगतो …

…मृकंडु नावाचे ॠषी होते, त्यांचे पुत्र होते मार्कंडेय, ते बालपणापासुन पित्याच्या संस्कारानुसार माता-पिता, गुरूजन आणी संत-महात्म्यांना नमस्कार करीत असत.
 एकदा एक सिध्द महात्मा त्यांच्याकडे आले, पिता बालक मार्कंडेय: "बाळ!या महाराजांना प्रणाम कर."बालक मार्कंडेयाने वाकून चरणस्पर्श केला आणि सिध्दपुरूषाची चरणरज मस्तकाला लावली, महात्मा त्या बालकाकडे एकटक पाहात राहिले, जणुकाही त्याच्या भावी जीवनावर दृष्टिपात करीत आहे! मृकंडु ॠषी ने विचारले :महाराज अशा प्रकारे एकटक काय पाहात आहात?

"बालक तर सुंदर आहे;परंतु आयुष्य खूपच की आहे,"
एवढे बोलून त्या सिध्दपुरूषाने पुन्हा विषाद पूर्ण नेत्रानी बालकाकडे न्याहाळले.
ॠषी तर त्यांच्या लाडक्या पुत्राविषयी ही दुखद गोष्ट एेकुन गोंधळुन गेले! त्यांनी हात जोडून महात्म्याला विनंती केली: "प्रभो! यावर एखादा उपाय सांगा?"
"जे जे संत-महापुरूष ॠषी, मुनी येतील त्यांच्या चरणी या बालकाकडुन नमस्कार करवून घ्या".हे सांगुन सिध्दपुरूष निघून गेले. मृकंडु ॠषी तसेच करू लागले. एके दिवशी सप्तर्षींचे आगमन झाले. पिता बालकाला प्रेमाने म्हणाले: *" बाळ ॠषीना नमस्कार कर".*
मार्कंडेयांनी खुप भावपुर्वक नमस्कार केला, सप्तर्षीनी बालकाच्या मस्तकावर हात ठेवून आर्शीवाद दिला ; *" चिरंजीवी हो"*
पिता म्हणाले: महाराज!याचे आयुष्य कमी आहे आणि याला तुमच्या द्वारे चिरंजीवी होण्याचा आर्शीवाद मिळाला आहे. प्रभो !आता तुमच्या आर्शीवाद अनुकूल होण्यासाठी आम्ही काय केले पाहिजे?.
सप्तर्षीं म्हणाले: या बालकाला भगवान शंकरांच्या सेवेत, पूजा, आराधना, उपासनेत मग्न करा, सर्वकाही ठीक होईल.
मृकंडु ॠषीनीं बालक मार्कंडेयला महादेवाच्या उपासनेते मग्न केले. बालक मार्कंडेय महादेवाच्या पूजा -सेवेत मग्न झाला, पहाटे लवकर उठून स्नानादी पवित्र होऊन शिवलिंगाला स्नान घालीत असे आसनावर बसून माळेवर *ओम नम: शिवाय* जप करीत असे, ध्यान करित असे, स्तुती स्तोत्रे पाठ करीत असे. अशा प्रकारे दिवसामागुन दिवस गेले.
मृत्यु ची वेळ जवळ येऊन ठेपली, काळ्या विकराळ रेड्यावर रक्तवर्ण यमराज प्रकट झाले, त्यांना पाहून बालक भयभीत झाला, घाबरून भगवान शंकराच्या लिंगाला मिठी मारून म्हणु लागला : *" हे भगवंता  !  हे यमराज आले आहेत, वाचवा …वाचवा …"*
भगवान शंकर हातात त्रिशूळ घेऊन प्रकट झाले आणि यमराजाला म्हणाले : या बालकाला कोठे घेऊन जात आहात?
यमराज  :  महादेवा!  याचे आयुष्य पूर्ण झाले आहे, सृष्टीच्या क्रमानुसार मी माझ्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी आलो आहे.
महादेव  : अरे यमराज!  जरा पहा तरी आपल्या वहिखात्यात … याचे आयुष्य कधी पूर्ण होते ते  ?
यमराजाने वहिखाते पाहिले तेव्हा बालकाच्या खात्यात दीर्घ आयुष्य जमा असलेले पाहिले, सृष्टीचा संहार करणारे देवाधिदेव महादेव ज्याचे रक्षण करतात त्याचे कोणी वाईट कसे करू शकेल  ?
*"चल पळ येथून"*रूद्र गरजले, यमराजस्य निरोप घेतला, *"मार्कंडेय चिरंजीवी झाले "*, कोण्याच्या प्रभावाने?  नमस्काराच्या प्रभावाने.असा महिमा आहे नमस्काराचा!

दररोज सकाळी माता पिता आणि पूजनीय -आदरणीय गुरूजनांना नमस्कार करा, प्रणाम करा, त्यांचे आर्शीवाद घ्या, *परमार्थ -साधना सरळ होईल..*
〰〰〰〰🙏〰〰〰〰
लिखाण व संकलन …
*🖊🖊श्रीधर कुलकर्णी*
रजि.१२.१९८९

*कृपया … लेख नावासकट पाठवा 🙏*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट