देहाची काळजी

                    देहाची काळजी
                   ------Shri-------

मला आज एक ओळखीचे गृहस्थ भेटले .सहजच गप्पा चालु होते व बोलताबोलता सहज ते म्हणालो माझे दोन दात बसवायचेा विचार आहे .पण डाॅक्टर खर्च खुप सांगत आहेत.मी म्हणालो"_किती सांगत आहेत..ते म्हणाले "_ डाॅक्टर जवळपास दोन्ही दाताचे मिळुन सोळा हजार रूपये खर्च येईल.. माझ्याकडे सध्या बसवायची परिस्थिती नाही . मी म्हणालो  " काय त्रास होत आहे का .. तो म्हणाला की .. जाम दुखतय काही खाताना ..थंड गरम काहीच लागु देत नाही .. सध्या पातळ पदार्थ खाऊनच भागवत आहे... _तेव्हा मला अचानक एक वाक्य आठवलं की हा देह आपल्याला देवाने फुकट दिला आहे त्याला काहीच किंमत नाही लावली_

मी त्याला म्हणालो .. जर दोन दाताचे सोळा हजार तर बत्तीस दाताचे किती होतील पण देवाने ते फुकट दिले आहे तरीही त्याचे आपण नाव घेत नाही व आभार मानीत नाही असे का .. हे तर फक्त दाताचा हिशोब बाकी अवयवाचा तर लांबच .. कितीही पैसा दिला तरी हा देह मिळत नाही. एखाद्याचे हाड तुटले व बसावयाला हजारो रूपये लागतात व ते पण लोखंडी राॅड .. त्याला जास्त काही हालचाल करता येत नाही व डाॅक्टर ही सांगतात.त्यावर भार देऊ नका व वजन जास्त ठेवु नका व देवाने आपल्याला मजबुत अवयव दिले आहेत कसेही हलवा व कितीही काम करा तरी ते मजबुत असतात. तरी आपण त्या देवाचे आभार मानीत नाही व  त्याचे नाव घेत नाही ... हा देह देवाने  असाच दिला आहे .त्याला काय त्याने चार्ज लावले नाहीत. हा देह देवाचा आहे व देवातच जाणार आहे . बाकी उरते फक्त पुण्यकर्म  .म्हणुन चांगले कर्म व देवाचे नामस्मरण हे प्रत्येकाने केला पाहीजे व ज्याचा देह आहे त्याला कृतार्थ केले पाहीजे.. तो आपल्याला काहीच मागत नसतो पण आपले कर्तव्य आहे की,त्याला भक्ती ने काहींना काही दिले पाहीजे .  तो सोनं ,रूपये, प्राॅपटी ..असे काहीच मागत नसतो. त्याला फक्त प्रेम पाहीजे असते व ती त्याची भक्ती करून देता येते.देव हा बाहेर हुडकायची गरज नाही तो आपल्यात आहे . तो फक्त शोधा.कर्म असे करा की तो आपल्याला दिसला पाहीजे  त्याची अनुभुती आपल्याला झाली     पाहीजे. मग बघा आपण व तो एकच आहे  असे जाणवेल व हा देह त्याने का दिला तेही समजेल.जिथं करोडो रूपये खर्चुन किडनी टाकुनसुध्दा तो अपंगच जीवन जगतो . तसे आपल्याला देवाने केले आहे का.त्याने तर मजबुत व एकदम फ्रेश आपल्याला देह दिला आहे.

ज्यांना एक ही अवयव नाही त्याला विचारा तो कसा जगतो पण आपल्याला देवाने सर्व देऊन ही आपण त्याची काळजी घेत नाही. _हा देह अनमोल नाही त्यास काही मोल|अनंत पैका देऊन ही  मिळणार नाही हा देह_

म्हणुन काळजी घ्या .एकएक अवयव व देहाची काळजी घ्या व हा देह कशासाठी आहे .याची जाणीव होउ द्या .ज्या देवाने सर्व काही दिले त्यांचे नामस्मरण तरी करणे हे त्या देहाचे सार्थकता आहे.
〰〰〰〰〰〰📕
©लेखन :- श्रीधर कुलकर्णी
नाव खोडु नका...स्वयंलिखित...

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट