चुकीचे प्रायश्चित

*चुकीचे प्रायश्चित*
_____Shri______


सर्वात अवघड काय म्हणले तर आपण केलेल्या चुकीचे प्रायश्चित करणे.काही चुका मिटुन जातात पण काही चुका मिटता मिटत नाही.ते सतत आपल्या पाठिमागे असतात.कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तरी ते सावरत नाही व ते आपण केलेल्या चुकीची पुनरावृत्ती होतच राहते.त्यामुळे प्रत्येकाने सारासार विचार करूनच पाऊल टाकावे. आपले एखादे पाऊल हे आपल्यासाठी व घरच्यांसाठी त्रासदायक ठरू शकते.एखादा चुकिचा निर्णय हा आयुष्यातला तापदायक ठरू शकतो व आपण कितीही सावरण्याचा प्रयत्न केला तर ते सावरत नाही. एखाद्या वेळेस सर्व सावरून व्यवस्थित चालते पण मतभेद असल्याने वादाला तोंड फुटल्याशिवाय राहात नाही.अशी चुक खुप वेदनादायी असते.त्यात आपणच नाही तर पुर्ण घरभार पिडले जाते व आपण फक्त पाहातच राहातो कारण आपण काहीच करू शकत नाही व असह्य होऊन ते सोसत राहातो.

एक परिवार गुण्यागोविंदाने असते .. त्या परिवारात एकाचे लव्हमेरेज होते.घरच्यांचा विरोध,किंवा संमती पण मनात असंमती देऊन त्याला स्विकार केलेले असते पण वैचारिक मतभेद असल्याने वारंवार वादावाद होतच राहात असते.स्वभावात मुलकीचा फरक असतो.एक दिवस सुखाचा तर एक दिवस दुखाचा.. त्या  एका चुकीच्या निर्णयाने सर्व जीवन विस्कळीत झाले.. हे सर्व ठिकाणी नसते बरंका काही ठिकाणीच बघायला मिळते.व लव्हमेरेजच नव्हे तर अॅरेजमेरेज मध्ये पण वैचारिक मत व आपलेपणा नसेल तर ते नाते खुपच त्रासदायक ठरते.व आवण फक्त बघ्याची भुमिका घेऊ शकतो.काय करणार आपलीच चुक झालेली असते व आपण तर काय करणार फक्त प्रायश्चित करावे लागते.की मी सारासार विचार का केला नाही. सर्व मला एवढे समजंस मानतात या विषयात समजंस. का दाखविला नाही. आपला निर्णय हा सर्वासाठी वेदनादायी ठरू शकते हे कसे लक्षात आले नाही.पण पुन्हा प्रायश्चित करून काय उपयोग जे व्हायचे ते होऊन गेले . जे घडायचे ते घडुन गेले.आता फक्त आलेले दिवस सारायचे... आणि दुसऱ्याच्या सुखी संसाराकडे बघत जळत बसतो.त्यामुळे आयुष्यात निर्णय घेताना सर्व बाजुंचा विचार करूनच घ्यावा.लव्हमेरेज असो किंवा अॅरेजमेरेज, व्यक्तीने सर्व विषयांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा कि,आपण जे करतोय ते योग्य आहे. याचा त्रास आपल्या परिवाराला नाही होणार ना.सर्व विचार व सर्वांचा विचार हे गृहितच धरूनच निर्णय घ्यावा जेणेकरून पुन्हा केलेल्या चुकीचे प्रायश्चित करण्याची वेळ येऊ नये.

तो असो किंवा ती .. दोघांनीही समर्पण ,आपलेपणाने त्याला स्विकारले पाहिजे व वैचारिक मत व स्वभाव हे एकमेंकात गुंतले पाहिजे.. हे सर्व नाते जोडण्याआधी स्पष्ट केले पाहिजे. नाहीतर आयुष्य हे खडतर होऊन बसते व दुसऱ्याच्या सुखी संसाराकडे बघुन मनातल्या मनात जळत बसत असतो.म्हणुन. निर्णय घेताना घाईगडबड न करता सर्व विचार व सर्वांचा परामर्श घेऊनच करावा.

यावर श्रीधर नेहमी म्हणतो ...
*सुखद नात्यांची घडावे अमृत*
*नातेही असावे सोज्वळ सुंदर*
*नका करू गडबड घेताना निर्णय*
*नाहीतर पुन्हा काय उपयोग करून*
*चुकीचे प्रायश्चित...*
______________________®
*लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
स्वलिखित.... नाव खोडु नका
© copyright....

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

श्रोता चे गुण व प्रकार