सुख म्हणजे काय
*सुख म्हणजे नक्की काय?*
*सुखाची नक्की व्याख्या काय?*
वाढत राहण म्हणजे सुख का झिजत राहण म्हणजे सुख?
का दुसऱ्यांसाठी झिजत झिजत वाढत राहण्यात खरं सुख??
सुखाचा खरा शोध लागलाय का कुणाला?
का सर्वानी लावालीएत आपली जगणीच पणाला..
मनाच्या एका कोपऱ्यात साठत ते सुख…
का आकाशाच्या पोकळीत लपत ते सुख…
काळाची बंधन झुगारण म्हणजे सुख…
का एखाद्या बंधानात जगण म्हणजे सुख…
चेहऱ्यावर पसरणार हसू म्हणजे सुख…
का आनंदाने ओलावानाऱ्या पापण्यात खरं सुख..
किती प्रकार या सुखाचे.. प्रत्येकाची आपली वेगळी व्याख्या..
कोणाला जिंकण्यात सुख मिळत तर कोणाला हरण्यात….
कोणाला काही मिळवण्यात सुख मिळत तर कोणाला कोणामध्ये तरी हरवण्यात …
प्रत्येकासाठी सुखाची एक वेगळी ओळख आहे..
म्हटलं आज या सुखाचा चेहरा जरा चाचपून बघावा…
नेहमीच रडत असतो आपण कोसळणाऱ्या दुखासाठी..
आज जरा सुखाचा पाऊसहि शोधून पहावा…
पण एक मात्र खरं…जसं ढग जेवढा काळा तेवढी त्याची किनार सुंदर दिसते, तसच खूप दुखानंतर आलेला एखादा आनंदाचा क्षण पण खूप काही देऊन जातो…
ते आनंदाचे छोटे छोटे क्षण अनुभवण्यात … ते जपण्यात आणि कुरवाळण्यात खरं सुख आहे…हे जिथे आणि जेंव्हा सुरु होत…
तिथे सुरु होतो सुखाचा.. सुखी जगण्याचा प्रवास.. दुख प्रत्येकालाच असतात पण त्या दुखातही आनंदाचे सुखाचे हे क्षण जगता आले पाहिजेत…
म्हणजे मग आयुष्य सोप होऊन जात… नाही का?
समाधान सुख सगळ मानण्यावरच असत का ?…. कारण सगळ्या वाईट, दुखी गोष्टींना आपण चांगलंच म्हणून तर नाही जगू शकत… चालताना ठेच लागल्यावर त्रास होणारच… पाय रक्तबंबाळ होणारच.. ते आपण नाही टाळू शकत…. पण त्यासाठी नेहमीच रडत बसण्यात काही अर्थ नसतो… कारण दुखानंतरच सुखाची खरी किंमत कळते….
मनाला समाधानी करण्यासाठी… सुखी करण्यासाठी…जगातली प्रत्येक गोष्ट… प्रत्येक सुख आपल्याकडे हवच अस नाही…
त्यासाठीतर एखादी सुंदर पहाट… थोडीशी सुस्त दुपार किंवा गोजिरवाणी रम्य संध्याकाळ यापेक्षा वेगळ सुख ते काय!!!!
श्रीधर कुलकर्णी

Comments
Post a Comment