काटकसर जीवनाची

  काटकसर जीवनाची
_______Shri________


काटकसर ..या शब्दातच काट्यावर चालणे किंवा मेहनत करताना सतत काटे टोचावे असाही होतो ..या शब्दाचा अर्थ चांगला आहे का वाईट काहीच कळत नाही पण सध्या या शब्दाचा अर्थ फक्त पैसा बचत हाच धरला जातो.व त्यावर अंमल ही केला जातो ...पण खरच एकच अर्थ असु शकतो ता या शब्दाचा..नाही काटकसर या वाक्याचे बरेच अर्थ निघतात.वेळेची काटकसर,खाण्याची काटकसर,पैशाची काटकसर .. सांगायचा मुद्दा हा आहे की, आपण जी काटकसर करतो ती खरच आपल्या सुखाची आहे.अर्थातच आहे असे काहीचे मत असते. बरेच लोक पैसा पाळुन असतात.. असे एेकण्यात येते..'पैसा पाळुन असतो"म्हणजे काय काय .. तो नुसता पाळायचाच का .. त्याचा वापर म्हणजे चांगल्या कामात वापर नाही का करायचा..*पैसा,वेळ, आयुष्य हे कुणासाठीही थांबत नसतो.ते सर्व फिरतच असते.. फक्त फरकच एेवढाच की ते जिथे विश्रांती घेतात तो थांबा आपण असतो.म्हणुन पोट मारून व जीव तोडुन काटकसर करण्याला काही अर्थच नाही.जी वस्तु तुमच्याच कामात येणार नाही त्या वस्तुची काटकसर कशाला करावी.. प्रत्येक व्यक्तीने मुक्तपणे जीवन जगले पाहिजे.आपल्या अवतीभोवती संकट ,किंवा आपले सहकार्य समाजाला लागल पाहिजेे .

काटकसर करावी ती चांगलीच असते पण काटकसरही मुक्तपणे करावी. आपले जीवन व सुखावर त्याचा काही परिणाम होणार नाही याची काळजी घेऊन करावी.."एक व्यक्ती इतका काटकसर करायचा की तो दिवसातुन फक्त एक वाटी भातच खायचा . नुसतं बचत करायचा .मागे दोन मुलं होते पण त्याने मुलांकडे लक्षच केले नाही . नुसतं काटकसर व मुलांकडे दुर्लक्ष पणामुळे मुलं केव्हा बापापासुन दुर झाले .. हे त्याला कळलेच नाही.. व ती मुलंं दारू ,टवाळी करण्यातच पैसा घालत होती.. इकडे बाप काटकसर करून उपाशी राहुन पैसा कमवत होता व मुलं पाण्यासारखं पैसा खर्च करत होता..त्याने धावपळ,काटकसर करून बरीच संपत्ती गोळा केली .. पण हाती काहीच लागले नाही असे त्याला पुन्हा वाटु लागले.मी जर मुक्तपणे मुलांकडे लक्ष व माया दिली असती तर ते या मार्गावर गेले नसते .. असे त्याला वाटु लागले... सर्वकाही कमावले पण तरीही मी भिकारीच आहे,मी स्वताच्या सुखाकडेही बघितले नाही व घरच्या सुखाकडेही .. पैशाची काटकसर करण्यात बायकोमुलाची ही मने मोडण्यात कसर केली नाही.मग काय उपयोग झाला या काटकसर ..सर्व व्यर्थ वाटुन तो पश्चात्तापाच्या अग्नीत जळु लागला व शेवटी तो गेल्यावर ही अगदी काटकसरीत लोक आले व मुलांनीही काटकसरीतच त्याला जाळले."

काटकसर करावी .. प्रत्येकाने केली पाहिजे पण ती करत असताना आपल्या.आजुबाजुच्या जीवनावर काही फरक पडणार नाही.याची काळजी घेऊन करावी.समाजाकडे मुक्तपणे आपली सेवा करून काटकसर करावी.. नात्यांची जपवणुक करताना कुणाचेही मन दुखवु नये याची आपल्या वागण्यात काटकसर करावी.

काटकसर करणे हे चांगलेच आहे. पण ती करत असताना माणसांचीही काटकसर करणे तेवढेच गरजेचे आहे.म्हणुन काटकसर ही जीवनाचा भाग समजावा .. ना की पुर्ण जीवन..
*आनंदाचे क्षण हे जगावे मुक्तपणे ||*
*नको करू त्यात तोलमाप रे*
*एकदाच मिळे हे जीवन रे मानवा* ||
*त्यातही का करतोस काटकसर रे*
______________________®
*लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
© स्वलिखित .. नाव खोडु नका

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट