इंद्रधनुष्य

🌈   इंद्रधनुष्य    🌈⛅
__________________🌈

इंद्रधनुष्य़ बघून फुलारून आला नाही असा माणूसच विरळा. ते वातावरणही फूलारून येण्यासारखंच असतं.

शाळेत असताना *"तानापिहीनिपाजा*" हे नेहमी एेकण्यात येत असत.सुरूवातीला त्याचा अर्थ मला कळत नसे पण हळुहळु त्या शब्दाचा उलगडा झाला व ते शब्द म्हणजे इंद्रधनुष्याच्या रंगाचे संक्षिप्तकरण होते हे मला समजले..वातावरण ढगाळ असले व पाऊसाची रिमझिम सुरू झाली की, एक रंगबिरंगी पट्टा आकाशात येत असे.तो इतका सुंदर व मनमोहक असे . तो पट्टा म्हणजे जणु आकाशाने घातलेली फुलांची माळच वाटे व त्यातील रंगाने ते अधिकच खुलत असे.त्यातले रंग म्हणजे जीवनात जणु सौदर्य खुलवणारे असत व ते रंग इतके आकर्षक वाटे की,यापुढे सर्व फिक्के वाटे.

तांबडा,नारंगी,पिवळा,हिरवा,निळा,पारवा ,जांभळा .. म्हणजेच तानापिहिनिपाजा ..या रंगाने मिळुन एक पट्टा निर्माण होत असे ..आकाशात तुषारीवर पडणाऱ्या सुर्यकिरणाच्या योगाने दिसणारी धनुष्याकृती  त्यालाच आपण इंद्रधनुष्य म्हणत असतो..प्रकाशकिरणांचे वक्रिभवन व परावर्तन या योगाने इंद्रधनुष्य पडत असते.

शाळेत असताना याचे रंग लक्षात ठेवायचे खुप प्रयत्न करायचो पण काही केल्या बरोबर जमत नव्हते .एखादा रंग पुढे मागे होयचाच ..पण आमच्या शिक्षकाने आम्हाला सोप्या भाषेत सांगितले ..इंद्रधनुष्याचे रंग जर बरोबर क्रमवारित ठेवायचे अयेल तर पुढचा एक एक शब्द घ्या व ते पाठ करा .. व आम्ही पुढचा एकएक शब्द घेऊन .. *तानापिहिनिपाजा*हा शब्द झाला व आम्हाला ही तो पटकन लक्षात ठेवता आले ... तेव्हा पासुन इंद्रधनुष्याचे रंग सांगा म्हणले तर तानापिहिनिपाजा च म्हणतो व त्या शब्दाचे स्पष्टीकरण ही व्यवस्थित देता येऊ लागले.

इंद्रधनुष्य पाहाताच सर्व काही नवलच वाटे व त्याला पाहुन कविमनातही शब्द फुटे .असेच बालकवी म्हणतात.


*श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे*
*क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे*
*वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे*
*मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे*
_____________________®
*लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
९६६५६३२९५३
स्वलिखित ...नाव खोडु नका
*© copyright*

Comments

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट