मैत्री :- एक अतुट नाते
मैत्री :- एक अतुट नाते..
-----------shri-----------
आज निवांत बसलो होतो.तेवढ्यात एक फोन आला . समोरून एक व्यक्ती बोलत होता. मला म्हणाला ..नमस्कार मी अमुक बोलतोय. मी आपल्या फेसबुकवर चा मित्र आहे.आपली ए वर्षापुर्वी फेसबुकवर मैत्री झाली.पण आपल्याला भेटायची इच्छा होती.म्हणलं आज फोन करावाच ... म्हणुन फोन केला व त्या व्यक्ती ने भेटायची इच्छा जाहीर केली..सुरूवातीला मला वाटलं काहीतरी फसवणुक असेल म्हणुन मी टाळाटाळ केली .पण त्याने दोनतीन वेळा फोन केला मग म्हणलं भेटुन बघावं व त्याला भेटायला बोलावलं .दुसऱ्या दिवशी तो आला.चांगला पदाधिकारी होता व उच्च पदनास्थ होता .मी ओळखले नाही पण त्याने ओळखले व मला म्हणाला नमस्कार मला तुम्हाला भेटायची इच्छा होती.ती आज पुर्ण झाली.मी त्याचे निरिक्षण केले तो खुपच मोठा व्यक्ती वाटत होता.. मी त्याला म्हणालो की, सर तुम्ही मोठे वाटत आहात व मी एक साधा माणुस मग मला भेटायची इच्छा का झाली.त्यावर तो म्हणाला .."कुणी छोटे नसते वा मोठे .. मैत्रीत सर्व सारखेच असतात.तुमची मैत्री मला खुप आवडली .. तुमचे संदर्भ व लेख मी आवडीने वाचतो.खरतरं मी नाही तुम्ही मोठे आहात."
त्याचे सर्व बोलणे मी निमुटपणे एेकत होतो . आमच्या तासभर चर्चा रंगली व तो परतीला निघाला..मला जाताना एवढचं म्हणाला की,आपली मैत्री विसरू नका.अशीच अखंडपणे तेवत राहु द्या .. व तो गाडीत बसला व निघाला .... जशीजशी त्याची गाडी लांब होत चालली तसे तसे माझ्या डोळ्यात पाण्याचे थर साटु लागले.मी पाहातच राहिलो व असचं बसल्याबसल्या फ्रेंड रिक्वेट मान्य केलेल्या .. आयुष्याचा एक घटक बनेल . याचे मनातही आणले नव्हते.. तेव्हा मला खरचं वाटु लागलं की, आपण काय कमावलं आहे ...भलेही पैसाअडका,संपत्ती,पद मिळाले नसेल पण आयुष्यात मैत्रीचे पद मात्र मला उच्च भेटले. सहजच केलेल्या ओळखीचे एक अतुट मैत्रीनात्यात कसे परिवर्तीत होते . हे आज मला बघायला मिळाले.व मला अभिमान वाटला सोशल माध्यमाद्वारे मिळालेले हे असे रत्न माझ्या आयुष्यात आले व माझ्या आयुष्यातलं मैत्री चे नाते अधिकच दृढ झाले.चांगली मित्र व मैत्री ही कमवावी लागते... माणुस सर्वकाही मिळवु शकतो पण निखळमैत्री मिळवु शकत नाही...कृष्ण देव होता.मोठा राजाही होता पण सुदामाने आणलेले मुठभर पोह्यात पण तो तृप्त झाला .. यालाच मैत्री म्हणतात. आजकाल सहामहिने ओळख सहा महिने तु कोण अशी धारणा चालु आहे. असे जेव्हा पाहातो तेव्हा मन खुप उदास होतं.. मैत्रीच्या नात्याला किती काळीमा फासतात.अस वाटतं ..
माझ्या मते..एकतर मैत्री करू नये आणि केलीतर शेवटपर्यत निभवावी.मैत्रीच्या या अतुट नात्याची सर्वानी काळजी घेतली पाहिजे व ती सांभाळली पाहिजे.आणि आजकाल तर सर्व जग जवळ आले आहे.. मैत्री करण्याते बरेच माध्यम विकसित झाले आहे..मी तर जेवढे मित्र होईल तेवढे गोळा करण्याचा प्रयत्न करत असतो.
*जपावे असे नाते*
*जीवन बहरून जावे*
*मिळवावे असे रत्ने*
*मैत्रीचे नाते पुर्ण व्हावे*
*जपावे ते सर्वानी असे*
*व्हावे ते मैत्री : एक अतुट नाते*
___________________ __®
*लेखन :- श्रीधर कुलकर्णी*
स्वलिखित... नाव खोडु नका..🙏🏻

Comments
Post a Comment