नशीब आणि प्रारब्ध

नशीब आणि प्रारब्ध
______Shri______

पृथ्वीतलावर आपल्याला मनुष्यजन्म मिळाला हे आपलं *नशीब* आहे. तर त्या मनुष्य देहाचे आपल्याला सार्थक करता आले याला *प्रारब्ध* म्हणतात. नशीब आणि प्रारब्ध यात सर्रास लोक नशीब आणि प्रारब्ध हे एकच आहे असं मानतात. पण नशीब आपण घडवायचं असतं तर मनुष्यदेहात नशीब घडवण्यास आपल्याला आपलं प्रारब्ध मदत करत असतं, असं काही लोकांचं मत आहे. जन्माला आल्यापासून लोक नशिबाच्या फे-यात अडकतात. काही जण तर आपण या वेळेतच का जन्माला आलो असं म्हणत कपाळावर हात मारत बसतात.

नशीब बदलावं यासाठी लोक आपलं कर्म (काम) बदलतात. पण नशीब हे सर्वस्वी प्रारब्धावर अवलंबून आहे, त्यामुळे धंदा-व्यवसाय किंवा काम बदललं की नशीब बदलेल याची हमी देता येणार नाही. या जगात नशिबाचे अनेक प्रकार आहेत. काही लोक आम्ही सदैव कमनशिबी आहोत असं म्हणत असतात. तर काही लोक आम्ही नशिबाला मानतं नाही. नशीब हा ज्याचा त्याचा मानण्या न मानण्याचा भाग असला तरीही त्याला प्रारब्धाशिवाय काही करता येत नाही. लोक म्हणतात, आम्ही जन्माला आलो, जगलो पण देहाचे सार्थक करता आले नाही. मग देहाचे सार्थक कसं करता येईल. यासाठी संतांनी विविध मार्ग सांगितले आहेत. प्रारब्ध बदलता येतं का, असा सवाल अनेक जण विचारतात. प्रारब्ध जरी बदलता आलं नाही तरी आता चांगले कर्म केले पाहिजे जेणेकरून पुढचा जन्म चांगला मिळेल.
________________________
श्रीधर कुलकर्णी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

चार देह

प्रपंच व परमार्थ

पाऊलवाट