श्रोता चे गुण व प्रकार
*श्रोता चे गुण व प्रकार*
_________🔺________
*उत्तम* आणि *अधम* असे श्रोत्यांचे दोन प्रकार मानलेले आहेत. *चातक, हंस, शुक, मीन* इत्यादी उत्तम श्रोत्यांचे पुष्कळ भेद आहेत. *वृक, भूरूंड, वृष, उष्ट्र* इत्यादी अधम श्रोत्यांचे सुद्धा अनेक भेद सांगितले आहते. चातक ढगातून पाडणार्या पाण्याचीच जशी अपेक्षा करतो, त्याचप्रमाणे जो श्रोता सर्व काही सोडून देऊन फक्त श्रीकृष्णांसंबंधीच्या शास्त्रांचे श्रवण करण्याचे व्रत घेतो, त्याला चातक म्हटले आहे. हंस ज्याप्रमाणे पाणी मिसळलेल्या दुधातून शुद्ध तेवढे घेतो, त्याचप्रमाणे जो श्रोता अनेक गोष्टी ऐकून त्यातील सार तेवढे घेतो, त्याला हंस म्हणतात. ज्याप्रमाणे चांगल्या रीतीने शिक्षविला गेलेला पोपट आपल्या मधुर वाणीने शिक्षकाला तसेच येणार्या इतरांनासुद्धा प्रसन्न करतो, त्याचप्रमाणे जो श्रोता ऐकलेली कथा मधुर वाणीने आणि थोडक्या शब्दात दुसर्यांना ऐकवितो व त्यायोगे व्यास व इतर श्रोत्यांना आनंद देतो, त्याला *शुक* म्हणतात. जशी क्षीरसमुद्रातील मासोळी मौन धारण करून पापण्या न मिटता पाहात राहून दुग्धपान करते, त्याप्रमाणे जो श्रोता कथा ऐकताना डोळ्यांच्या पापण्याही न मिटता आणि तोंडातून एक शब्दही बाहेर न काढता अखंड कथारसाचाच आस्वाद घेत राहातो, तो प्रेमी श्रोता मीन म्हटला गेला आहे.
वनामध्ये बासरीचा मधुर आवाज ऐकण्यात मग्न झालेल्या हरिणांना लांडगा जसा भयानक ओरडण्याने भिववितो, त्याचप्रमाणे मूर्ख माणूस कथा श्रवण करीत असतांना रसिक श्रोत्यांना डिवचीत मध्येच मोठ्याने बोलतो, तो *वृक* म्हणावा. हिमालयाच्या शिखरावर असलेला भूरुंड नावाचा पक्षी कोणाची तरी उपदेशपर वाक्ये ऐकून तसेच बोलतो, परंतु स्वतः त्यापासून बोध घेत नाही. याप्रमाणे जो उपदेशपर गोष्टी ऐकून त्या दुसर्यांना शिकवितो, परंतु स्वतः तसे आचरण करीत नाही, अशा श्रोत्याला भूरुंड म्हणतात. बैलासमोर द्राक्षे येऊ देत किंवा कडवट पेंड, दोन्ही तो एकाच चवीने खाते, त्याप्रमाणे जो ऐकलेले सारेच ग्रहण करतो, परंतु घेण्याजोगे काय व टकण्याजोगे काय हे ठरविण्यास ज्याची बुद्धी असमर्थ असतो, असा श्रोता वृष म्हटला जातो. उंट ज्याप्रमाणे आंबा सोडून फक्त कडूलिंबाचा पालाच चघळतो, त्याप्रमाणे जो भगवंतांच्या मधुर कथा ऐकण्याचे सोडून त्याऐवजी संसारातील गोष्टीत रममाण होतो, त्याला उंट म्हणतात. असे काही थोडेसे भेद सांगितले आहेत. त्यांच्याव्यतिरिक्तसुद्धा उत्तम-अधम अशा दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांचे ’भ्रमर’,’गाढव’ इत्यादी अनेक भेद आहेत. हे भेद त्या त्या श्रोत्यांच्या स्वाभाविक आचार-व्यवहारावरून ओळखता येतात. जो वक्त्याला योग्य रीतीने प्रणम करून त्याच्यासमोर बसतो आणि इतर संसारातील गोष्टी सोडून फक्त श्रीभगवंतांच्या कथाच ऐकण्याची इच्छा ठेवतो, समजून घेण्यात अत्यंत कुशल असतो, नम्र असतो, हात जोडलेले असतात, शिष्यभावनेने श्रद्धा ठेवून, ऐकले असेल त्याचे सतत चिंतन करीत राहातो, जे समजले नसेल ते विचारतो, पवित्र भावनेने वागतो, तसेच श्रीकृष्णभक्तांवर सदैव प्रेम करतो, अशाच श्रोत्याला वक्ते लोक उत्तम श्रोता म्हणतात.
〰〰〰〰〰〰📕
*चिंतन व लेखन :-* श्रीधर कुलकर्णी
*माहीती स्रोत :-* श्रीमद् भागवत..
*ज्ञानामृत मंच ग्रुप*

श्रोत्यांची वर्गवारी खूपच सुंदर !
ReplyDeleteजयहरि