मोक्ष व मुक्ती
मोक्ष व मुक्ती
____Shri____
मोक्ष वा मुक्ती .. एका नाण्याचे दोन पैलु ...मोक्ष म्हणजे काय .. आपला आत्मा परब्रह्मात लीन होणे .. मुक्ती म्हणजे काय.. आपला आत्मा जन्ममरणाच्या या संसारबंधनातुन मुक्त होणे ..पण दोन्हीचे वर्णन व उद्देश्य एकच आहे की, या संसारबंधनातुन सुटका .. हे कसे मिळते व यासाठी काय करावे लागते हाही प्रश्न च आहे. द्रव्याचे योगाने मोक्ष प्राप्त होण्याची आशा नाही, अशी श्रुति आहे. तद्वत् कर्माच्या योगानेही मुक्ति मिळण्याची आशा नाही असे स्पष्ट श्रुति सांगत आहे. *श्रद्धा, भक्ति आणि ध्यानयोग हे मुक्त होऊ इच्छिणाराला मुक्तीचे उपाय आहेत, असे साक्षात वेदवाणी सांगते.* जो या उपायांवरच अवलंबून राहतो, त्याची अविद्येने कल्पिलेल्या देहबंधनापासून सुटका होते.
देहाची बंधने म्हणजे ,वासना, एकात जीव अडकणे ,त्याचा आत्मा कुठेतरी गुंतुन बसणे ही मुक्ती नाही,ज्याच्या सर्व इच्छा व वासना संपुष्टात आल्या आहेत.आत्म्याला मागे वळुन बघायची गरच उरत नाही ती मुक्ती होय .व आत्म्याची भक्ती ही पहब्रह्मलीन होते तेव्हा त्यास मोक्ष मिळतो.अंतर फक्त एका स्टेशनच आहे अर्थ एक असला तरी विश्लेषण वेगळे आहे.
विवेकचुडामणी सांगते:- क्रियेचा नाश झाला म्हणजे चिंतनाचा नाश होतो आणि चिंतनाचा नाश झाला म्हणजे वासनांचा नाश होतो. वासनांचा अतिशय नाश होणे याचेच नाव *मोक*्ष आणि यालाच *जीवन्मुक्ति* म्हणतात. ॥
जीव आणि सकल जगत ब्रह्मरूपच आहे आणि अखंड रूपाने राहणे हाच मोक्ष होय. हेच काय ते वेदान्ताच्या सिद्धांताचे व्याख्यान आहे. ब्रह्म अद्वितीय आहे अशाविषयी श्रुति प्रमाण आहे.
तसे पाहायला गेले तर मोक्ष म्हणजे काय याचे वर्णन करून सर्व शास्त्रे, सर्व वेद, उपनिषदे, पुराणे थकली.
*मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. 'जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिति' अशी मोक्षाची व्याख्या करता येईल*
मोक्ष हे जीवनात मिळतो व मुक्ती ही देहातुन मिळते.साम्य असले तरी फरक समांतर आहे..
रामदासस्वामींची एक सुंदर. ओवी आहे..
जेचि क्षणी अनुग्रह केला l तेचि क्षणी मोक्ष झाला l
बंधन काही आत्मयाला l बोलों चि नये ll
(दासबोध ८-७-५९)
____________________®
*लेखन:- श्रीधर कुलकर्णी*
स्वलिखित..नाव खोडु नये.

।।श्री गुरु देव दत्त माऊली।।
ReplyDeleteSuparb
ReplyDelete