प्रकृती आणि पुरूष वर्णन
प्रकृती आणि पुरूष यांचे वर्णन ----------------------------------------- अष्टधा प्रकृति आणि क्षेत्रज्ञ या दोघांनाही तू अनादि-नित्य जाण. त्याचप्रमाणे बुद्धि, इंद्रिये, देह, इत्यादि विकारांस व सुख-दुःख-मोहरूप गुणांस तू ईश्वराच्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीपासून झालेले समज.. कार्य-शरीर व करण-सर्व इंद्रिये, यांच्या कर्तृत्वाविषयी वरील प्रकृति निमित्त आहे, असे सांगितले जाते, त्याचप्रमाणे सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाविषयी क्षेत्रज्ञ-जीव निमित्त सांगितला जातो. देहाची आरंभक-देह ज्यांच्यापासून उत्पन्न होतो ती भूते, विषय व शरीरे हे विकार हा येथील ‘कार्य’ शब्दाचा अर्थ आहे. त्याचप्रमाणे तेरा इंद्रिये व त्यांचा आश्रय करून राहणारे सुख-दुःख-मोहात्मक गुण, हा येथील ‘करण’ शब्दाचा अर्थ आहे. त्यांचे कर्तृत्व प्रकृतीला आहे. त्यांना उत्पन्न करणे या रूपाने ती त्यांचे कारण आहे. अशा कार्य, करण, कर्तृत्वामुळे प्रकृति संसारकारण आहे. पुरुष म्ह. जीव-क्षेत्रज्ञ-भोक्ता, सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाचे निमित्त आहे. प्रकृति शरीरेंद्रियांच्या कर्तृत्वाने व पुरुष सुख-दुःखांच्या भोक्तृत्वाने संसाराचे निमित्त ह...